Israel-Hamas War | जग झिडकारत असताना हा देश गाझाच्या मदतीला, कोणता हा देश पाहा
गाझातील हॉस्पिटलवर काल झालेल्या रॉकेट हल्ल्यात 500 नागरिक ठार झाले आहेत. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता युरोपातील एका देशाने गाझातील शरणार्थींना आश्रय देत उपचार करण्याची तयारी दर्शविली आहे.
नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : अख्खं जग गाझाच्या रेफ्युजी किंवा निर्वासितांना घेण्यास तयार नसताना युरोपातील एक देश मात्र गाझाच्या लोकांना आश्रय देण्याठी तयार झाला आहे. स्कॉटलंडचे पंतप्रधान हमजा युसूफ यांनी आमचा देश गाझातून येणाऱ्या लोकांना आश्रय देण्यास तयार आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपला देश मदत करेल. परंतू ब्रिटनचे पंतप्रधान ऋृषी सुनक यांच्या सरकारने त्यासाठी योजना आणावी अशी अट त्यांनी टाकली आहे.
गाझातील हॉस्पिटलवर काल झालेल्या रॉकेट हल्ल्यात 500 नागरिक ठार झाले आहेत. त्यामुळे एकीकडे मुस्लीम देशांच्या बैठकीत इराणने इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणी 57 देशांच्या ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन ( OIC ) च्या सौदी अरब मधील बैठकीत केली आहे. दुसरीकडे स्कॉटलंड सारख्याचे देशाचे पंतप्रधान हमजा युसूफ गाझातील जखमींना मदत करायला तयार आहेत. हमाजा युसूफ स्वत: पाकिस्तानी वंशाचे असून त्यांची पत्नी पॅलेस्टिनी वंशाची आहे. 1707 मध्ये स्कॉटलंड ब्रिटनमध्ये सामील झाला असला तरी त्यांची स्वतंत्र संसद आहे. अनेकदा स्कॉटलंडने ब्रिटनपासून स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. परंतू आतापर्यंत ते शक्य झालेले नाही. या देशाचे मोठे मंत्रालय वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ब्रिटन सरकारच्या अखत्यारित आहेत. येथील पंतप्रधानाला फर्स्ट मिनिस्टर म्हटले जाते.
स्कॉटलंडचे पंतप्रधान काय म्हणाले ?
सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान युसूफ म्हणतात की आमची इच्छा आहे की युनायटेड किंगडममध्ये स्कॉटलंड पहिला देश बनावा जेथे गाझातून पलायन केलेल्या लोकांना आश्रय मिळेल. ब्रिटीश सरकारने एखादी अशी योजना आणावी, ज्यामुळे गाझातील लोकांवर स्कॉटलंडमध्ये उपचार मिळतील. सुनक सरकारने गाझाच्या लोकांसाठी सेटलमेंट योजना त्वरीत आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही आधीही आमच्या हृदयाचे आणि घराचे दरवाजे उघडे केले आहेत. सिरिया आणि युक्रेनचे लोक येथे यावेत. आताही आमची इच्छा आहे की गाझाचे लोक यावेत. गाझात 10 लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. त्यांच्या जगाने रिफ्युजी कॅंम्प खोलावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्नीचा भाऊ गाझात डॉक्टर
युसुफ यांच्या पत्नीचा भाऊ गाझात डॉक्टर आहे. त्याने तेथील स्थिती स्कॉटलंडच्या पंतप्रधानांना सांगितली आहे. तेथे दवाखान्यात औषधे संपली आहे. उपचाराअभावी लोकांचे प्राण जात आहेत. यावर अनेक युजरनी पाठींबा दिला तर काहींनी आक्षेप व्यक्त केला. तुमच्या देशातील बेघरांना मदत कराल की नाही ? इस्रायलींवर उपचार कराल ? का असे प्रश्न विचारले जात आहेत.