इंग्लंड : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार (Corona Strain) सापडल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं. जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या दोन केसेस सापडल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिली आहे. विषाणूचा नवा अवतार दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. (Second more transmissible strain of coronavirus detected in UK)
दक्षिण आफ्रिकेहून परत आलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःला आयसोलेट करावे, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून सापडलेला अवतार यूकेत सापडलेल्या अवतारापेक्षा अधिक खतरनाक असल्याचं मानलं जातं. कारण त्याच्या संसर्गाचा वेग अधिक जास्त आहे. कोरोनाचा पहिला नवा अवतार दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये सापडला होता. मात्र आता तो संपूर्ण देशात पसरला आहे. अशातच आणखी एक नवा स्ट्रेन सापडल्यामुळे घबराट पसरली आहे.
दक्षिण आफ्रिकेत नवा स्ट्रेन सापडल्याची भीती
ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेले नवीन स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या ज्या दोन केसेस आहेत, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास केला आहे. दक्षिण आफ्रिकेची सतर्कता आणि पारदर्शकतेबाबत आम्ही आभारी आहोत. त्यामुळेच नवीन स्ट्रेनबाबत माहिती मिळाली, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या दोन बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात आलेल्या सर्व ब्रिटनच्या रहिवाशांनाही क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत संशोधन केलं जात आहे.
Union Health Secretary Rajesh Bhushan reviewed status of passengers coming from UK to India & found positive in Maharashtra, Karnataka, Telangana, Tamil Nadu, West Bengal, Goa, Punjab, Gujarat & Kerala, & their response measures in a meeting held through video conferencing today pic.twitter.com/NH21kXImMr
— ANI (@ANI) December 23, 2020
लंडनच्या पाच प्रवाशांनी धाकधूक वाढवली
लंडनहून दिल्लीत आलेल्या विमानातील पाच प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण 266 प्रवाशी त्या विमानात होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्येच कोरोनाचा घातक विषाणू सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे
नववर्षाच्या जल्लोषावर बंधनं
नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरु होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात. मात्र घराबाहेर एकत्र जमून होणाऱ्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधनं घालण्यात आली आहेत.
युरोपीय प्रवाशांवर निर्बंध
संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात दिवसांसाठी स्वखर्चाने त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करावे लागेल. तर अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
केवळ मास्कमुळे कोरोनापासून बचाव अशक्य, नव्या संशोधनाने भीती वाढली!
कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!
(Second more transmissible strain of coronavirus detected in UK)