उत्तर पाकिस्तानमध्ये रहस्‍यमय जीवन जगणारी जमात, तब्बल 150 वर्षांपर्यंत जिवंत राहतात

उत्तर पाकिस्‍तान हा जगाचं लक्ष्य वेधून घेणारा रहस्यमय भाग आहे. या भागातील हुंजा व्हॅली (हुंजा खोरं) खूप रहस्यांनी भरलेली असल्याचं मानलं जातं.

उत्तर पाकिस्तानमध्ये रहस्‍यमय जीवन जगणारी जमात, तब्बल 150 वर्षांपर्यंत जिवंत राहतात
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 9:27 PM

इस्लामाबाद : उत्तर पाकिस्‍तान हा जगाचं लक्ष्य वेधून घेणारा रहस्यमय भाग आहे. या भागातील हुंजा व्हॅली (हुंजा खोरं) खूप रहस्यांनी भरलेली असल्याचं मानलं जातं. पाकिस्तानचं सरासरी आयुर्मान 67 वर्षे असताना या ठिकाणचे लोक तब्बल 120 वर्षे ते 150 वर्षे जगतात. ब्रिटिश वृत्तपत्र टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर पाकिस्तानमधील हा हुंजा समुह जगासाठी एक रहस्य बनला असून यावर संशोधन होणं आवश्यक आहे (Secret of Long life of Hunja tribal community in north Pakistan).

हुंजा खोऱ्यातील या समुहाच्या काही खास सवयींमुळे त्यांना इतकं दीर्घ आयुर्मान मिळाल्याचंही सांगितलं जातं. मात्र, जगभरात या विषयी प्रचंड कुतुहल आहे. नेमक्या या सवयी कोणत्या असा प्रश्न कायमच विचारला जातो. त्या निमित्तानेच हा खास आढावा.

वयाच्या 90 वर्षांपर्यंत मुलांना जन्म

हुंजा समुहातील लोक तब्बल 90 वर्षांपर्यंत मुलांना जन्म देऊ शकतात, असं सांगितलं जातं. हे लोक कधीही आजारी पडत नाही. कर्करोग (कँसर) सारखे आजार तर त्यांच्या आसपासही नाहीत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हुंजा समुहातील स्त्रिया 60 ते 90 वर्षे वयापर्यंत गर्भधारण करु शकतात. हा असा एक दावा आहे ज्यावर बाह्य जगातील कोणत्याही सर्वसामान्य महिलेला विश्वास बसणार नाही. मात्र, सध्या तरी असे अनेक आश्चर्यकारक दावे केले जात आहेत.

रहस्यमय आयुर्मानामागे कोणत्या सवयी?

हुंजा खोरं उत्तर पाकिस्तानमधील अगदी दूरच्या भागात राहतात. इतर जगापासून कोसो दूर अंतरावर राहणारा हा समाज कोणतंही प्रक्रिया केलेलं अन्न खात नाही. त्यांच्या खाण्यात पालेभाज्या, दूध, धान्य आणि फळं या गोष्टी असतात. त्यांच्या खाण्यातील खास गोष्ट म्हणजे हुंजा खोऱ्यातील खूबानी नावाचं फळ. खूबानी हे फळ हुंजा समुहात अगदी सर्रास आणि आवडीनं खाल्ल जातं. या फळाच्या रसावर हे लोक अनेक दिवस जिवंत राहू शकतात असंही सांगितलं जातं. खूबानीच्या बियांमध्ये एमीग्‍डालिन असते आणि ते व्हिटॅमिन बी-17 चा स्त्रोत आहे. याशिवाय ते हिमालयातील बर्फाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी करतात.

या सर्व कारणांमुळेच या समुहातील लोकांना धोकादायक आजार होत नाहीत असं म्हणतात. या समुहाच्या जेवणात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांचा उपयोग होतो, मांस मात्र खूप कमी प्रमाणात खाल्लं जातं. हे ठिकाण जगापासून दूरवर असल्याने या येथे शुद्ध हवा सहजपणे उपलब्ध आहे.

व्यायामात काय करतात?

हुंजा लोक दररोज योगा करतात. यात ते श्वासोच्छवासाशिवाय ध्यानधारणाही करतात. हे लोक ऊर्जा व्यवस्थापन आणि ताण कमी करण्यावरही भर देतात. सातत्याने काम करत असताना ते आरामालाही प्राधान्य देतात. तसेच तणाव तयार करणाऱ्या गोष्टींपासून ते दूर राहतात.

हेही वाचा :

Healthy Food | आरोग्यवर्धक पपईचे जाणून घ्या ‘हे’ फायदे…

Health Tips | आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही सवय?, मग तुम्ही देताय आजारांना आमंत्रण…!

आद्रकच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

व्हिडीओ पाहा :

Secret of Long life of Hunja tribal community in north Pakistan

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.