Pakistan : अखेर शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, देशाचे 23वे पंतप्रधान म्हणून शपथ, मोदींकडून अभिनंदन आणि दहशतवादावरून कानपिचक्या
पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली असताना आज पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये नवीन पंतप्रधान निवडीदरम्यान, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या सर्व खासदारांनी घरातून वॉकआउट केले. आज इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी यांनीही त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार एकत्रितपणे राजीनामे देणार असल्याची घोषणा केली.
दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात खळबळ उडाली असताना आज पाकिस्तानचे नवे पंतप्रधान (PM) म्हणून शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची निवड करण्यात आली आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये नवीन पंतप्रधान निवडीदरम्यान, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या सर्व खासदारांनी घरातून वॉकआउट केले. आज इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी यांनीही त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार एकत्रितपणे राजीनामे देणार असल्याची घोषणा केली. पाकच्या संसदेत आज पंतप्रधानपदासाठी मतदान झाले असता शाहबाज यांना 174 मते मिळाली. ज्याला अनेक खासदारांनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करताना म्हटलंय की, ‘भारताला दहशतवादमुक्त क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य हवे आहे, जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करू शकू.’
मोदींकडून अभिनंदन आणि दहशतवादावरून कानपिचक्या
Congratulations to H. E. Mian Muhammad Shehbaz Sharif on his election as the Prime Minister of Pakistan. India desires peace and stability in a region free of terror, so that we can focus on our development challenges and ensure the well-being and prosperity of our people.
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2022
शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली
#WATCH | Shehbaz Sharif, Pakistan opposition leader, elected new PM
Source: PTV pic.twitter.com/lYcOeYbwQp
— ANI (@ANI) April 11, 2022
पीटीआय पक्षाकडून ट्विट केलेला व्हिडीओ
ایک مجرم اس قوم کا حکمران بنایا جا رہا ہے، جو اس قوم کو بیکاری کہہ رہا ہے اس کو ہم کیسے اپنا حکمران مانیں۔#امپورٹڈ_حکومت_نامنظور pic.twitter.com/sdwx6ioXdY
— PTI Azad Kashmir (@PTIAJK_Official) April 10, 2022
विविध पदावर काम
शाहबाज शरीफ यांची प्रशासनावर चांगली पकड असून ते प्रशासक म्हणून ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रातांचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. 1951 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. मरहूम मिया मुहम्मद हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. 1997 ते 1999, 2008-2013, 2013-2018 या वर्षी त्यांनी पंजाबचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.
भारतातून कुटुंब पाकिस्तानात
मुहम्मद शरीफ हे व्यावसायिक होते. त्यांची आई पुलवामा येथे वास्तव्यास होती. व्यवसायासाठी ते काश्मीरला जात होते. त्यांचं कुटुंब पंजाबच्या अमृतसरमध्ये स्थलांतरित झालं. तर, 1947 च्या फाळणीच्या वेळी शरीफ कुटुंब लाहोरला गेलं. शाहबाज यांना चार मुलं आहेत. 2003 मध्ये त्यांनी दुसरं लग्लन केलं आहे. व्यावसायिक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरु केली होती. 1985 मध्ये त्यांनी लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडरस्ट्रीचं अध्यक्षपद स्वीकारलं.1987 -88 मध्ये शाहबाज शरीफ सक्रीय राजकारणात आले. 1988-1990 या काळात ते पंजाब विधानसभेचे सदस्य होते. 1990 ते 1993 मध्ये ते नॅशनल असेंब्लीचे सदस्य राहिलेत.
मनी लॉंड्रिंगमध्ये तुरुंगवास
शाहबाज शरीफ हे कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात देखील गेले आहेत.सप्टेंबर 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांना अटक करण्यात आली होती. तर, एप्रिल 2021 मध्ये ते जामीनावर बाहेर आले होते.
इतर बातम्या
लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी हजार रुपयाची तलवारदेखील हातात ठेवा