बांग्लादेशकडून कोणते बेट मागत होता हा देश ? शेख हसीना म्हणाल्या जर दिले असते तर सार्वभौमत्व धोक्यात आले असते…

5 ऑगस्टच्या सायंकाळी बांग्लादेशातील बंडाळीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत भारत गाठला. भारतात त्या किती काळ राहतील हे कोणालाच माहीती नाही. या संदर्भात त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

बांग्लादेशकडून कोणते बेट मागत होता हा देश ? शेख हसीना म्हणाल्या जर दिले असते तर सार्वभौमत्व धोक्यात आले असते...
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 1:14 PM

बांग्लादेशातून पदच्युत झालेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना आपल्या सरकार पाडण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने सेंट मार्टिन बेट मागितले होते. ते न दिल्याने आपल्याला सत्तेवर तुळशीपत्र सोडावे लागले. अमेरिकेला बंगालच्या उपसागरात प्रभूत्व निर्माण करायचे होते. बांग्लदेशी नागरिकांनी कट्टरपंथीयांच्या नादी लागू नये असे आवाहन शेख हसीना यांनी केले आहे. शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे.

शेख हसीना यांचे सरकार विद्यार्थी आंदोलकांनी उलथवून लावले आहे. या नंतर तेथे नवीन अंतरिम सरकारचा शपथविधी देखील झाला आहे. आपण राजीनामा दिला कारण मला प्रेतयात्रा पाहायच्या नव्हत्या. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहाच्या बदल्यात सत्ता हवी होती. परंतू माझे मन तयार नव्हते. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे शेख हसीना यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितले आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने या संदर्भात बातमी दिली आहे. जर मी सत्तेत राहीली असते तर सेंट मार्टीन बेटाची स्वाययत्ता अमेरिकेकडे असती. त्यांना बंगालच्या खाडीत आपला सैन्य तळ निर्माण करायचा आहे. माझ्या देश बांधवांना एकच विनंती की त्यांना कट्टर पंथीयांच्या नादाला लागू नये असेही हसीना म्हणाल्या आहेत.

मी पुन्हा परतेन – शेख हसीना

जर मी देशात राहीले असते तर अनेक जीव गेले असते. अधिक संपत्ती आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असते. त्यामुळे देश सोडण्याचा कटू निर्णय मला घ्यावा लागल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे. मी तुमची नेता बनली कारण तुम्हीच मला निवडून दिले होते. तुम्हीच माझी ताकद आहात. माझ्या अवामी लिग पार्टीच्या अनेक नेत्यांचे मृत्यू झाल्याचे ऐकूण मला अश्रू अनावर झाले आहेत. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांची घरे तोडली जात आहेत. अल्लाच्या कृपेने मी पुन्हा माझ्या बांग्लादेशात परतेन, अवामी लीग अनेक संकटांशी लढून पुन्हा उभी राहीली आहे. मी नेहमीच बांग्लादेशाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करेन. ज्या राष्ट्राचे स्वप्न माझ्या वडीलांनी पाहीले त्यासाठी प्रयत्न केला, तो देश ज्याच्यासाठी माझे वडील आणि कुटुंबियांनी आपले प्राण दिले त्या देशात मी पुन्हा परतेन असा विश्वासही हसीना यांनी व्यक्त केला आहे.

मी तुम्हाला कधी असे बोललेच नाही

जॉब कोट्यासाठी निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की मी कधी त्यांना रझाकार म्हटलेले नाही. परंतू तुमची माथी भडकविण्यासाठी माझे व्हिडीओ फेरबदल करुन व्हायरल केले गेले. त्या दिवसाचा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही पाहा मग काय ते ठरवा, षडयंत्र रचणाऱ्यांनी तुमच्या भोळेपणाचा फायदा उचलला. 5 ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी शेख हसीना यांना बांग्लादेशातून पळून जावे लागले. आणि भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. आरक्षण विरोधी आंदोलनाच्या आधी शेख हसीना यांनी एप्रिल महिन्यात संसदेत सांगितले होते की अमेरिका बांग्लादेशात सत्ता परिवर्तन करण्याची चाल खेळणार आहे.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.