Australia : ऑस्ट्रेलियामध्ये विमानतळावर गोळीबार; मोठी दुर्घटना टळली, संशयित आरोपीला अटक

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कॅनेबेरा विमानतळावर (Airport) रविवारी गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या घटनेनंतर विमानतळ रिकामे करण्यात आले आहे.

Australia : ऑस्ट्रेलियामध्ये विमानतळावर गोळीबार; मोठी दुर्घटना टळली, संशयित आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 2:59 PM

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कॅनेबेरा विमानतळावर (Airport) रविवारी गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या घटनेनंतर विमानतळ रिकामे करण्यात आले आहे. सोबतच एका संशयित व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या गोळीबारीच्या घटनेत एकाच व्यक्तीचा सहभाग असून, विमानतळाच्या मेन टर्मिनल्सवर गोळीबार करण्यात आला. हे विमानतळ कायमच गजबलेले असते.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने विमानतळ परिसरात काही काळ गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. या विमानतळावरून होणारी विमानाची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.

विमानतळ बंद

ऑस्ट्रेलियाच्या कॅनेबेरा विमानतळावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ताडडीने विमानतळ रिकामे केले आहे. तसेच या विमानतळावरून होणारे विमानांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. स्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा विमान सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एका संशयित व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पोलिसांना एक शस्त्र देखील आढळून आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तिची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने हे विमानतळ रिकामे केले असून, प्रवाशांना विमानतळ परिसरात न येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या विमानतळावरून होणारे विमानाची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.या घटनेनंत पोलिसांनी विमानतळावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज ताब्यात घेतले असून, या फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची देखील चौकशी करण्यात येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.