Sri Lanka : पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती बिघडली, हिंसाचारात 5 ठार, जमावाने राजपक्षे यांचे घर जाळले

पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे, कारण आतापर्यंत हिंसाचारात 5 जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे, तर यात आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट म्हणजे जमावाने महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Sri Lanka : पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती बिघडली, हिंसाचारात 5 ठार, जमावाने राजपक्षे यांचे घर जाळले
पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती बिघडलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:18 PM

श्रीलंका : श्रीलंकेत (Sri Lanka) गेल्या काही दिवसांपासून महागाई (Inflation) आणि हिंसाचाराने (Violence) थैमान माजवले होते. त्यानंतर त्यांचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी यांनी आज अखेर परिस्थितीपुढे गुडघे टेकत राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे, कारण आतापर्यंत हिंसाचारात 5 जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे, तर यात आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट म्हणजे जमावाने महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले असल्याचीही माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे. महागाईने इथले लोक त्रस्त झाले आहेत. लोकांना खायला अन्न नाही त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरत आहे. मात्र आता पंतप्रदानांनीच गुडघे टेकल्याने देशाची पुढीची दिशा काय असणार आहे? याचा अंदाजही कुणाला लागत नाहीये. त्यातूनच हा हिंसाचार भडकला आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेले व्हिडिओ

एका खासदाराचाही मृत्यू

या झालेल्या हिंसाचारात एका खासदाराचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  श्रीलंकेत सोमवारी राजपक्षे बंधूंच्या सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि सरकारचे समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) खासदार अमरकिर्ती अतुकोराला यांना पोलोन्नारुआ जिल्ह्यातील पश्चिमेकडील नितांबुआ शहरात सरकारविरोधी गटाने घेरले होते. त्याचवेळी खासदारांच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली आणि संतप्त जमावाने त्यांना कारमधून बाहेर काढल्यावर त्यांनी पळ काढला आणि एका इमारतीत आश्रय घेतला, असा दावा लोक करतात. खासदाराने स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की इमारतीला हजारो लोकांनी वेढले होते आणि नंतर खासदार आणि त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी मृत आढळले. न्यूज फर्स्ट वेबसाइटनुसार, गोळीबारात आणखी एका 27 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला. दरम्यान, कोलंबोमधील गोटागोगामा आणि मानागोगामा स्थळांवर झालेल्या हिंसक हल्ल्यांनंतर श्रीलंकेतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. SLPP पक्षांच्या नेत्यांच्या मालमत्तेवरही हल्ले होत आहेत. माजी मंत्री जॉन्सन फरलाडो यांच्या कुरुणेगाला आणि कोलंबो येथील कार्यालयांवर संतप्त जमावाने हल्ला केला आहे. त्याच्या बारला आग लावण्याची माहिती समोर आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.