Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जवाहरलाल नेहरुंचं नाव घेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राजकारण्यांचे कान टोचले!

Singapore Prime Minister Lee Hsien Loong : ज्या प्रमाणे भारतात नेहरुंनी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला, तसाच संघर्ष आपल्या देशातही झाला, असं ते म्हणालेत.

Video | जवाहरलाल नेहरुंचं नाव घेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राजकारण्यांचे कान टोचले!
सिंगापूरचे पंतप्रधान संसदेत बोलताना..
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 5:27 PM

सिंगापूर : जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख करत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी (Singapore Prime Minister Lee Hsien Loong) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्या वक्तव्यात जवाहरलाल नेहरुंच्या नावाचा उल्लेख करत राजकारण्यांचे कान सिंगापूरचे पंतप्रधान ली शिंग लूंग यांनी टोचले आहेत. आपआपल्या राष्ट्रातली लोकशाही (Democracy) कशी अबाधित राहिल, यासाठी कसं काम करायला हवं, यावर सिंगापूरचे पंतप्रधान तिथल्या संससदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नेहरुंच्या देशात (Jawaharlal Nehru) जसं संसदेत बलात्कार आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे असलेली लोकं दिसून येत आहेत, तसं आपल्याकडे व्हायला नको, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी विशेषाधिकार समितीच्या अहवालावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यावेळी त्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. जवाहरलाल नेहरु  यांची भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाची भूमिका बजवाली. भारताची लोकशाही उभी करण्यात त्याचं योगदानही मोठं आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र ज्या मूल्यांवर लोकशाही कायम राहायला हवी, ती मूल्य जपण्याची गरज आहे, असंही ते म्हणालेत. पण दुर्दैवीनं काळाच्या ओघात ही मूल्य विसरुन जात ज्यांनी लोकशाही राष्ट्रासाठी लढा दिला, एक नेतृत्त्व म्हणून जी माणसं उदयाला आली, त्यांचे विचार आणि त्यांची मूल्य ही मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सिंगापूरच्या पंतप्रधानांचं महत्त्वाचं विधान

संसदेत बोलताना सिंगापूरच्या पंतप्रधानांनी म्हटलंय, की…

नेहरुंनी उभ्या केलेल्या भारत देशातील संसदेबाबत मीडिया रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतातील लोकसभेतल्या अर्ध्याहून अधिक खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात बलात्कार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. असंही म्हटलं जातं की, त्यातील बहुतेक गुन्हे राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आले आहेत. सिंगापूरला या मार्गापासून दूर न्यायचं असेल तर काय करावं लागेल?

ज्या प्रमाणे भारतात नेहरुंनी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला, तसाच संघर्ष आपल्या देशातही झाला. आपल्या देशातच एक मजबूत आणि ताकदवर लोकशाही मूल्यांची पेरणी करण्यात आली. या मूल्यांना जपण्याचं काम येणाऱ्या पिढ्यांनी करणं, ही आपली जबाबदारी आहे.

अप्रत्यक्षपणे त्यांनी लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांवर निशाणा साधलाय. फक्त भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतल्या निवडणुका जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख करत त्यांनी आपली लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 44 मिनिटं 30 सेकंद केलेल्या आपल्या भाषणात ली शिंग लूंग यांनी सहाव्या मिनिटापासून लोकशाही, जवाहरलाल नेहरु आणि लोकशाही मूल्यांवर वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी लोकशाहीला फाटा देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी केलेलं संसदेतलं भाषण आता भारतातही चांगलंच चर्चेत आलंय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Delhi high court : ही खुर्ची ‘सर’साठी आहे? Justice Rekha Palli यांनी वकिलाला दिला सल्ला; वाचा रंचक वृत्त

हिमालयातल्या अज्ञात साधूच्या इशाऱ्यावर कोट्यवधींचा शेअर बाजार? माजी सीईओ चित्रा रामकृष्णांवर छापे, म्हणतात, ती एक अदृश्य शक्ती!

‘भारत छोडो आंदोलना’ची ठिणगी पडली आणि इंग्रजांना पळता भुई थोडी झाली

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.