बॉलीवूड अभिनेत्याची नसेल एवढी रिहानाची संपत्ती, आकडा वाचून….
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पूर्व विवाह सोहळ्यात जगातील अनेक नामवंत उद्योजक, कलाकारांची अक्षरश: मांदियाळी जमली होती. याच सोहळ्यात आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना हीने परफॉर्म करण्यासाठी किती बिदागी घेतली यापासून ते तिची संपत्ती किती आहे याविषयी चर्चा सुरु आहेत.
मुंबई | 7 मार्च 2024 : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या पूर्व विवाह सोहळ्यात जगभरातील नामीगिरामी हस्तींनी हजेरी लावल्याने या सोहळ्याची दखल जगभराने घेतली. आंतरराष्ट्रीय गायिका असलेल्या रिहाना नेहमीच तिची पर्सनल लाईफ, करीयर, नेटवर्थ आणि वादविवादाने चर्चेत असते. या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी रिहाना हीने 74 कोटी रुपयाचं मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. तिच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, बॉलीवूडच्या अभिनेत्यापेक्षाही जादा रिहानी संपत्ती आहे.
रिहानाचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 मध्ये बारबाडियन येथे झाला होता. तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही. ती स्कूल ड्रॉप आऊट आहे. तिच्या गायकीच्या बळावर ती जगप्रसिध्द आहे. साल 2005 मध्ये ‘म्युझिक ऑफ द सन’ नावाचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज झाला होता. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर पोहचली. त्याच वर्षी ‘ब्रिंग इट ऑन : ऑल ऑर नथिंग’ या चित्रपटात काम केले होते.
रिहानाची नेटवर्थ
रिहाना आज जगभरात प्रसिध्दीच्या झोतात आहे. तिच्याकडील संपत्तीचे आकडे डोळे दीपविणारे आहेत. रिहानाची संपत्ती भारतीय रुपयांच्या हिशेबात 11 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. साल 2009 मध्ये रिहाना ही अमेरिकन गायक क्रिस ब्राऊनला डेट केल्याने चर्चेत आली होती. ब्राऊन याने रिहानाला खूप मारहाण केली होती. असे म्हटले जाते की ब्राऊन याने तिला मारहाण करुन कारच्या बाहेर फेकले होते. त्यावेळी चेहऱ्यावर जखमा झाल्याची तिचे कथित फोटोही व्हायरल झाले होते. परंतू हे फोटो रिहानाचे असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले नव्हते. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिचे वय केवळ 21 वर्षे होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा
साल 2021 मध्ये रिहानाने दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविणारे ट्वीट केल्याने तिला भाजपा समर्थकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यावेळी या ट्वीटसाठी तिला 18 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. क्रिस ब्राऊन याच्या शिवाय अनेक जणांशी तिचे नाव जोडले गेले होते. कॅनेडीयन गायक ड्राके, अभिनेता रयान फिलीप, फ्रेंच फुटबॉलर करीम बेंजेमा यांना देखील तिने डेट केले आहे.