जगातला एकमेव देश जेथील चलन रद्दीच्या भावात वजन करुन घेतात, काय आहे नाव ?
या देशातील चलनाचा निचांकी भाव आहे. त्यामुळे तुम्ही या देशात गेलात तर तेथील करन्सी मोजण्याच्या ऐवजी वजनाने तोलून घेतली जातो.

जगभरातील निरनिराळ्या देशात प्रत्येकाचे वेगवेगळे चलन असते. भारतात रुपया आहे तर बांगलादेशात टका नावाचे चलन आहे तर थायलंडला बाथ, तर अमेरिकेतली डॉलर प्रसिद्ध आहे. युरोपियन देशात पाऊंड आणि युरोचा बोलबाला आहे. प्रत्येक देशाची करन्सी त्यांच्यासाठी महत्वाची असते. दुसऱ्या देशात जेव्हा कोणी पोहचले तर त्यांना करन्सी एक्सचेंज करावे लागते. परंतू जगात एक असाही देश आहे, जेथील करन्सी एकदम बेकार आहे. जर तुम्ही येथील बाजारात वस्तू विकत घ्यायला गेला तर करन्सी रद्दीच्या भावात वजन करुन घेतली जाते.
या स्वयंघोषीत देशाचे नाव तुम्हाला माहिती आहे का ? जर या देशाचे नाव माहिती नसेल तर ते “सोमालीलँड” असे आहे. सोशल मीडियावर या देशातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात हा दावा केला आहे. सोमालीलँडची अधिकृत करन्सी सोमालीलँड शिलींग आहे. या व्हिडीओ सांगितले जात आहे की येथील चलन इतके घसरलेले आहे की त्यांची मोजणे करण्याऐवजी त्यांना तराजूने तोलले जाते.
या देशाचे नाव सोमालीलँड असून हा देश स्वत:ला स्वतंत्र मानतो. परंतू जगाने त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेला नाही. आफ्रीकेच्या पूर्वेला असणाऱ्या सोमालीलँडचे क्षेत्रफल कमी आहे.साल १९९१ मध्ये सोमालिया गृहयद्धात बुडाला होता. तेव्हा सोमालीलँडने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषीत केले होते. हा देश १ लाख ३७ हजार चौरस फूटापर्यंत पसरला आहे. येथील लोकसंख्या अवघी ४० लाख आहे.येतील करन्सी वेगळीच आहे. येथे लोक करन्सीला भाजी सारखे विकत घेतात. येथे १ अमेरिकन डॉलरचे सुमारे ५७० सोमाली शिलिंगच्या बरोबरीचे असते.




सोमालीलँडवर एका अमेरिकन डॉलरचा किंमत १० हजार ते ११ हजार सोमालीलँड शिलिंग एवढी होते. त्यामुळे लोक पैसे मोजत बसण्याऐवजी थेट वजनाने तोलण्यावर भरोसा आहे. जर भारताचे शंभर रुपये येथे नेले तर त्या बदल्यात १२ हजार सोमालीलँड शिलींग मिळतील.