South Korea : अरे देवा, 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं… घरी लवकर पोहण्याच्या अनेकांच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी…Video Viral

South Korea Muan Airport A plane Crashed : दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. या विमानात 181 प्रवासी होते. कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर, विमान कोसळले. या विमानात 47 जणांचा मृत्यू झाला. त्यात 6 कर्मचारी आणि 175 प्रवासी होते.

South Korea : अरे देवा, 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं... घरी लवकर पोहण्याच्या अनेकांच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी...Video Viral
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 9:48 AM

दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. या विमानात 181 जण होते. विमान बोईंग 737-800 मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले. त्यात 47 जणांचा मृत्यू झाला. त्यात 6 कर्मचारी आणि 175 प्रवासी होते. हा अपघात पाहता, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. योनहाप वृत्तसंस्थेनुसार, उतरतेवेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि संरक्षण भिंतीला धडकले. त्यात मोठा स्फोट झाला. काही तांत्रिक त्रुटी पण समोर येत आहे.

अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी

हे सुद्धा वाचा

संरक्षण भिंतीला हे विमान धडकल्यानंतर विमानाला आग लागली. हा अपघात अचानक घडल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानाला आग लागल्यानंतर आकाशात धूराचे लोट पसरले. मुआन विमानतळावर तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली. आग विझवण्याचे आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. जेजू एअर कंपनीचे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियात परत येत होते. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

लँडिंग गिअरमध्ये अडचणीने अपघात

सुरक्षा पथकाने विमानातील मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले. लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने विमानतळावर हा अपघात घडला. दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्रपती चोई सांग-मू यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी मुआन विमानतळावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आणि पुढील उपचाराचे आदेश दिले. चोई सांग-मू यांना शुक्रवारी देशाचा अंतरिम नेता म्हणून निवडण्यात आले.

विमान धावपट्टीवरून घसरले

बँकॉकहून या विमानाने उड्डाण घेतले. त्यातील प्रवाशी आता आपण घरी पोहचणार, तर त्यांचे नातेवाईक त्यांची वाट पाहत होते. दरम्यान कोरियन वेळेनुसार, सकाळी 9:07 वाजता मुआन विमानतळावरील धावपट्टीवर विमान घसरले आणि कुंपणाला धडकले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व अपघाताचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात विमानाला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे दिसते.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.