South Korea Plane Crash : एका तांत्रिक गडबडीने 179 प्रवाशांचे घेतले प्राण, कॅनडात प्रवाशी वाचले बालंबाल, Video…
South Korea Plane Crash : दक्षिण कोरियात विमान कोसळले. एका तांत्रिक गडबडीने 179 प्रवाशांचे प्राण घेतले. या विमानातून 181 जण प्रवास करत होते. धावपट्टीवर विमानाचं चाक घसरल्याने ते कुंपणाला धडकलं आणि मोठा अपघात झाला.
दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. या विमानात 181 जण होते. विमान बोईंग 737-800 मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरुन घसरले आणि संरक्षण भिंतीला धडकले. त्यात 6 कर्मचारी आणि 175 प्रवासी होते. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एका तांत्रिक गडबडीने 179 प्रवाशांचे प्राण घेतले. घटनेत दोन प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. संरक्षण भिंतीला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. आकाशात एकच धूराचे लोट पसरले. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. आपत्कालीन यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
विमान संरक्षण भिंतीवर आदळले
जेजू एअर कंपनीचे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियात परत येत होते. बँकॉकहून या विमानाने उड्डाण घेतले. कोरियन वेळेनुसार, सकाळी 9:07 वाजता मुआन विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरले. पण त्याचे चाक घसरले आणि ते संरक्षण भिंतीवर जाऊन आदळले. या सर्व अपघाताचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. विमानाला आग लागलेली आणि धूराचे लोट निघत असल्याचे दिसले.
#BREAKING An Image from the Crash Site of Jeju Air Flight 2216 at Muan International Airport in South Korea, showing the Tail of the Aircraft engulfed in Flame@fastnewsnet pic.twitter.com/PBNOEyx0DW
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 29, 2024
या तांत्रिक गडबडीने घेतले प्राण
लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. दक्षिण कोरियाचे कार्यवाहक राष्ट्रपती चोई सांग-मू यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी मुआन विमानतळावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. पण यात प्रवाशांना वाचवता आले नाही. दोघांची सुखरूप सुटका करता आली. सुरक्षा पथकाने विमानातील मागील भागातून या प्रवाशांना बाहेर काढले.
कॅनाडामध्ये पण विमान धावपट्टीवरून घसरले
In addition to the Plane Crash earlier today in South Korea, another Commercial Airline Incident occurred tonight at Halifax International Airport; when PAL Airlines Flight 2259, a De Havilland Canada Dash 8-400 with Air Canada, was forced to make an Emergency Landing after… pic.twitter.com/z4KJV4C3DY
— OSINTdefender (@sentdefender) December 29, 2024
दक्षिण कोरियासारखीच घटना कॅनाडा या देशात घडली. हेलीफॅक्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. PAL एअरलाईन्सचे 2259 चे विमान धावपट्टीवर उतरत होते. त्यावेळी त्याची डावी बाजू अचानक झुकली. विमान एका बाजूला घासत गेले. डाव्या बाजूकडील लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. पण विमान तसेच धावपट्टीवर उतरवण्यात आले. त्यात मोठी दुर्घटना टळली. एका बाजूला झुकल्याने प्रवाशांना किरकोळ मार लागला. तर लँडिंग गिअरमध्ये आग लागली. ती लागलीच विझवण्यात आली.