South Korea News : गदारोळानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष झुकले, 6 तासांत मार्शल लॉ घेतला मागे, लेटेस्ट अपडेट काय ?

Martial Law in south Korea : दक्षिण कोरियामध्ये राजकीय संकट वाढले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी देशात आणीबाणी मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र काही तासांच त्यांनी त्यांचा निर्णय बदलत मार्शल लॉ मागे घेण्याची घोषणा केली.

South Korea News : गदारोळानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष झुकले, 6 तासांत मार्शल लॉ घेतला मागे, लेटेस्ट अपडेट काय  ?
दक्षिण कोरिआत मार्शल लॉ मागे
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 9:30 AM

जगभरात सध्या अस्थिर वातावरण असून अनेक भागांत युद्धाचे ढग फिरत आहेत. त्यातच दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा निर्णय अवघ्या 6 तासांच्या आतच मागे घेतला. कोरिया हेराल्डच्या रिपोर्टनुसार, देशातील नागरिकांची निदर्शने आणि त्यांचा रोष पाहता राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी सकाळी ( 4 डिसेंबर 2024) त्यांचा आदेश मागे घेत नॅशनल असेब्लींची विनंती मान्य केली. मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती हेही त्यांनी मान्य केलं.

“मी ताबडतोब नॅशनल असेंब्लीची विनंती स्वीकारत आहे आणि कॅबिनेटद्वारे मार्शल लॉ उठवत आहे,” असे युन यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्राला संबोधित करताना सांगितले. “मी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, पण सकाळची वेळ असल्याने अद्याप कोरम पूर्ण झालेला नाही. कोरम पूर्ण होताच मार्शल लॉ हटवण्यात येईल. त्यांच्या संबोधनानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आणि मार्शल लॉ हटवण्यास मंजुरी देण्यात आली. लोकांच्या रोषानंतर मागे घ्यावा लागला आदेश

मंगळवारी रात्री राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा तसेच उत्तर कोरियाबद्दल सहानुभूती दाखवण्याचा आणि देशविरोधी कारवाया करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र रात्री 10 वाजता हा आदेश जारी केल्यानंतर अवघ्या सहा तासांत, पहाटेच्या सुमारास त्यांनी हा आदेश मागे घेतला. मार्शल लॉ लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयानतंर देशभरात बराच गदारोळ झाला. या घोषणेनंतर सेना, विरोधी पक्षाचे खासदार आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. जनतेचा प्रचंड विरोध आणि रोष पाहून अखेर राष्ट्राध्यक्षांना त्यांचा आदेश मागे घ्यावा लागला.

राष्ट्रपतींच्या आदेशाच्या विरोधात विरोधकांचं मतदान

याआधी मंगळवारी संध्याकाळी उशिरा राष्ट्राध्यक्ष यून यांनी “राज्यविरोधी शक्तींचा नायनाट करण्याची” गरज सांगून मार्शल लॉ जाहीर करून संपूर्ण देशाला धक्का दिला होता. या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विधानसभेचे तातडीचे पूर्ण अधिवेशन बोलावले. यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये उपस्थित असलेल्या 190 खासदारांनी राष्ट्राध्यक्ष यून यांच्या मार्शल लॉच्या घोषणेच्या विरोधात मतदान केले. कोरियाच्या मुख्य विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीसह उदारमतवादी पक्षांने यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये बहुतांश जागा जिंकल्या आहेत.

दुसरीकडे मार्शल लॉ मागे घेतल्यानंतर यासाठी तैनात करण्यात आलेले सैनिकही आपापल्या तळावर परतले. दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4:22 पर्यंत सर्व सैन्य त्यांच्या तळांवर परत आले.

अमेरिकेकडून राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत

दरम्यान या संपूर्ण घडामोडींवर अमेरिकेची नजर आहे. मार्शल लॉ लागू झाल्यानंतर देशात झालेला गदारोळ आणि विरोधकांचं प्रदर्शन यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. मात्र राष्ट्राध्यक्षांनी आदेश मागे घेताच अमेरिकेने या निर्णयाचे कौतुक केलं. “अमेरिकेने गेल्या २४ तासांत कोरिया प्रजासत्ताकमधील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण केले आहे. मार्शल लॉ मागे घेण्याच्या राष्ट्राध्यक्ष यून यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो” अमेरिकेने जारी केलेल्या एका निवेदनात नमूद करण्यात आलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.