Sunita Willaims : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सबाबत खुशखबर, नवा व्हिडीओ पहाल तर…

नासाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबतया क्रूचा एक व्हिडिओही जारी केला आहे. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल स्पेस स्टेशनवर पोहोचल्याचे नासाने म्हटले आहे. SpaceX ने शनिवारी बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे पुढील वर्षी दोन प्रवासी मायदेशी परतणार आहेत.

Sunita Willaims : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सबाबत खुशखबर, नवा व्हिडीओ पहाल तर...
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जूनपासून अंतराळात आहेत
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 9:54 AM

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये अडकले असून, ते पृथ्वीवर परत कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आठ दिवसाच्या मिशनवर गेलेल्या त्या दोघांना आता सुमारे वर्षभर अंतराळात रहावे लागणार आहे. मात्र आता यासदंर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरंतर अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, वाट पाहिल्यानंतर अंतराळवीर निक हेग आणि रोस्कोस्मोसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसएक्से ड्रॅगन कॅप्सूल द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये पोहोचले आहेत. विल्यम्स, बुच यांनी स्पेसएक्सच्या क्रू चे स्वागत केले.

नासाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह क्रूचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये दोघांनीही मायक्रोफोनद्वारे संबोधत करत हेग आणि गोर्बुनोव्ह यांचे स्वागत केले. सुनीता आणि बुच हे दोघेही अंतराळवीर जून 2024 पासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. SpaceX ने शनिवारी बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे पुढच्या वर्षी दोन प्रवासी मायभूमीवर (पृथ्वीवर) परतणार आहेत.

हे सुद्धा वाचा

NASA ने जारी केलेल्या विधानानुसार, हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी संध्याकाळी 7:04 वाजता स्पेस स्टेशन आणि प्रेशराइज्ड मॅटिंग अडॅप्टर दरम्यान हॅच उघडल्यानंतर ISS मध्ये प्रवेश केला. नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, मायकेल बॅरेट, जीनेट एप्स, डॉन पेटिट, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स, तसेच रोस्कोस्मोसचे अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेबेंकिन, ॲलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅगनर यांच्यासह स्पेस स्टेशनच्या एक्सपीडिशन 72 क्रूने हेग आणि गोर्बुनोव्ह स्वागत केले.

काय म्हटले नासाने ?

एक्स ( पूर्वीचं ट्वविटर) या सोशल नेटवर्किंग साईटवर नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘ऑफिशिअल वेलकम ! एक्सीपीडिशन 72 च्या क्रू ने क्रू 9 चे स्वागत केलं. नासाचे अंतराळवीर निक हेग, क्रू 9 कमांडर आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह, क्रू 9 मिशन स्पेशलिस्ट, स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर उड्डाण केल्यानंतर स्वागत करण्यात आले.’

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जूनपासून अंतराळात आहेत. हे दोघे 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळात गेले होते. सुनीता आणि बुच यांचं हे स्पेसमधलं मिशन आठ दिवसांचं होतं पण आता ते 8 महिन्यांचं झालंय. अंतराळात त्यांनी आत्तापर्यंत 3 महिने घालवले असून दोघांनाही आणखी 5 महिने तरी तेथेच रहावे लागणार आहे. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, ते मात्र आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे.

पुढल्या वर्षी पृथ्वीवर येतील सुनीता आणि बुच

सुनीता आणि बुच हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून पुढल्या वर्षी ते पृथ्वीवर परत येऊ शकतील. सुनीता विल्यम्स आणि ,बुच विल्मोर यांनी मोहिमेचा एक भाग म्हणून औपचारिकपणे त्यांचे काम सुरू ठेवले आहे. आणि पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ते पृथ्वीवर लँड करतील.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.