अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये अडकले असून, ते पृथ्वीवर परत कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आठ दिवसाच्या मिशनवर गेलेल्या त्या दोघांना आता सुमारे वर्षभर अंतराळात रहावे लागणार आहे. मात्र आता यासदंर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरंतर अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, वाट पाहिल्यानंतर अंतराळवीर निक हेग आणि रोस्कोस्मोसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसएक्से ड्रॅगन कॅप्सूल द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये पोहोचले आहेत. विल्यम्स, बुच यांनी स्पेसएक्सच्या क्रू चे स्वागत केले.
नासाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह क्रूचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये दोघांनीही मायक्रोफोनद्वारे संबोधत करत हेग आणि गोर्बुनोव्ह यांचे स्वागत केले. सुनीता आणि बुच हे दोघेही अंतराळवीर जून 2024 पासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. SpaceX ने शनिवारी बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे पुढच्या वर्षी दोन प्रवासी मायभूमीवर (पृथ्वीवर) परतणार आहेत.
NASA ने जारी केलेल्या विधानानुसार, हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी संध्याकाळी 7:04 वाजता स्पेस स्टेशन आणि प्रेशराइज्ड मॅटिंग अडॅप्टर दरम्यान हॅच उघडल्यानंतर ISS मध्ये प्रवेश केला. नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, मायकेल बॅरेट, जीनेट एप्स, डॉन पेटिट, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स, तसेच रोस्कोस्मोसचे अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेबेंकिन, ॲलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅगनर यांच्यासह स्पेस स्टेशनच्या एक्सपीडिशन 72 क्रूने हेग आणि गोर्बुनोव्ह स्वागत केले.
काय म्हटले नासाने ?
एक्स ( पूर्वीचं ट्वविटर) या सोशल नेटवर्किंग साईटवर नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘ऑफिशिअल वेलकम ! एक्सीपीडिशन 72 च्या क्रू ने क्रू 9 चे स्वागत केलं. नासाचे अंतराळवीर निक हेग, क्रू 9 कमांडर आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह, क्रू 9 मिशन स्पेशलिस्ट, स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर उड्डाण केल्यानंतर स्वागत करण्यात आले.’
The official welcome!
The Expedition 72 crew welcomed #Crew9, @NASAAstronauts Nick Hague, the Crew 9 commander and cosmonaut Aleksandr Gorbunov, the crew 9 mission specialist, after their flight aboard the @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/pOa8sTQWDo
— NASA’s Johnson Space Center (@NASA_Johnson) September 29, 2024
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जूनपासून अंतराळात आहेत. हे दोघे 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळात गेले होते. सुनीता आणि बुच यांचं हे स्पेसमधलं मिशन आठ दिवसांचं होतं पण आता ते 8 महिन्यांचं झालंय. अंतराळात त्यांनी आत्तापर्यंत 3 महिने घालवले असून दोघांनाही आणखी 5 महिने तरी तेथेच रहावे लागणार आहे. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, ते मात्र आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे.
पुढल्या वर्षी पृथ्वीवर येतील सुनीता आणि बुच
सुनीता आणि बुच हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून पुढल्या वर्षी ते पृथ्वीवर परत येऊ शकतील. सुनीता विल्यम्स आणि ,बुच विल्मोर यांनी मोहिमेचा एक भाग म्हणून औपचारिकपणे त्यांचे काम सुरू ठेवले आहे. आणि पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ते पृथ्वीवर लँड करतील.