महागाईविरोधात बोलाल तर खबरदार; या देशात थेट फासावर लटकवतात, 29 तरुणांना एकाचवेळी फाशीची शिक्षा
जर तुम्हाला वाटत असेल महागाई वाढली आहे, तुम्हाला जगणं अवघड झालं आहे, तर सर्व सहन करा. मात्र तुम्ही जर महागाईविरोधात बोलाल तर तुम्हाला थेट फासावर लटकवलं जात.
जर तुम्हाला वाटत असेल महागाई वाढली आहे, तुम्हाला जगणं अवघड झालं आहे, तर सर्व सहन करा. मात्र तुम्ही जर महागाईविरोधात बोलाल तर तुम्हाला थेट फासावर लटकवलं जाईल. या तुघलकी कारभाराचा फटका तब्बल 29 तरुणांना बसला आहे. वाढत्या महागाईविरोधात आवाज उठवल्यानं त्यांना आता थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात येण्याची शक्यता आहे.नायजेरियामध्ये महागाईविरोधात आवाज उठवल्यानं 29 अल्पवयीन तरुणांवर तेथील सरकारनं खटला चावला आहे. देशात वाढत्या महागाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहाभागी झाल्याचा या तरुणांवर आरोप आहे. शुक्रवारी या प्रकरणाशी संबंधित सुनावणी पूर्ण झाली. यावेळी भीतीमुळे यातील चार जण बेशुद्ध देखील पडल्याची घटना घटना घडली.
द एसोसिएडेट प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार नायजेरियामध्ये महागाईविरोध आंदोलन करणाऱ्या एकूण 76 आंदोलकांवर देशद्रोह, संपत्तीचं नुकसान, सार्वजनिक शांती भंग करणं, सरकारविरोधात विद्रोह अशा गंभीर स्वरुपाचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 29 मुलं 14 ते 17 वयोगटातील आहे. नायजेरियामध्ये वाढत असेली माहागाई आणि बेरोजगारीमुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे. याविरोधात गेल्या महिन्यामध्ये देशात मोठं आंदोलन झालं.मात्र हे आंदोलन तेथील सरकारनं दडपून टाकलं. आंदोलनात सहभागी झालेल्या वीस व्यक्तींची गोळी मारून हत्या करण्यात आली.तर शंभरपेक्षा अधिक नागरिकांना अटक करण्यात आलं. दरम्यान आंदोलकांवर ज्या कलमातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्या गुन्ह्यासाठी नायजेरियात फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. त्यामुळे आता या 29 अल्पवयीनं मुलांना देखील फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
नायजेरियामध्ये 1970 च्या दशकात फाशीची शिक्षा सुरू झाली होती. मात्र 2016 नंतर या देशात कोणालाही फाशी देण्यात आली नाही. मात्र आता या 29 तरुणांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.या संदर्भात तेथील एका खासगी वकिलानं सांगितलं की, नायजेरीयामध्ये बाल हक्क कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलांना फाशी देता येत नाही. मात्र या मुलांना जर सरकार फाशीची सुनावणार असेल तर आधी न्यायालयात या मुलांचं वय हे 19 वर्षांपेक्षा अधिक आहे, हे तेथील सरकारला सिद्ध करावं लागले.