Special Story : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय?

इंग्लंडमध्ये (UK) कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (New Covid-19 Variant) आढळला आहे. या नव्या प्रकाराचा इंग्लंडमध्ये हजारो नागरिकांना संसर्ग झालाय.

Special Story : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय?
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 7:13 AM

लंडन : इंग्लंडमध्ये (UK) कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (New Covid-19 Variant) आढळला आहे. या नव्या प्रकाराचा इंग्लंडमध्ये हजारो नागरिकांना संसर्ग झालाय. कोरोनाच्या (SARS-COV-2) या नव्या अवताराचं नाव “VUI-202012/01” किंवा B.1.1.7 असं आहे. या नव्या कोरोनाची संसर्ग क्षमता अधिक असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच जगभरातील देशांनी खबरदारी म्हणून इंग्लंडमधील हवाई वाहतुकीवर काही निर्बंध आणले आहेत. तसेच हा नवा कोरोना प्रकार आपल्याकडे येऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. भारतासह जवळपास 30 देशांनी नव्या कोरोना अवताराचा धसका घेत ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत (Special Story Know all about new Corona strain found in England New Covid-19 Variant).

भारतातील 6 व्यक्तींमध्ये देखील नवा कोरोना विषाणू आढळला आहे. या 6 व्यक्ती इंग्लंडहून भारतात परतल्या होत्या. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांच्या चाचणीनंतर हा प्रकार समोर आलाय. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला. या सर्व 6 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा नवा अवतार ब्रिटननंतर आता जगातील इतर 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याची चर्चा असल्याने इतर देशांची चिंता वाढलीय. काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

‘कोरोनाच्या नव्या अवतारानंतर इंग्लंडमध्ये एका दिवसात 32 हजार नवे रुग्ण’

“कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. एका दिवसांमध्ये जवळपास 32 हजार नवे रुग्ण आढळल्याचंही समोर आलं. कोरोनाचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याचा धोका नव्या कोरोना विषाणुमुळे 70 टक्के आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली असून त्यासाठीच सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे,” असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केलंय.

कोरोना विषाणूमधील बदल नेमका काय?

कोणत्याही विषाणूंमध्ये सातत्याने जनुकीय बदल होत असतात. कोरोना विषाणूतही असेच बदल झाले. त्यामुळे हे बदल अगदी असामान्य किंवा अनपेक्षित नाहीत, असं मत इंग्लंडमधील विषाणूतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या विषाणूमध्ये जीनोममधील 6 बेस डिलिट झाले आहेत. या बेसमध्ये स्पाईक प्रोटिनमधील 69 आणि 70 क्रमांकाच्या अमिनो आम्लांची माहिती असते. हे बेस डिलिट झाल्याने कोरोनाचा हा नवा अवतार काही कोरोना चाचण्यांमध्ये सापडत नाही. नव्या विषाणूचा चाचण्यांवर परिणाम होत असल्याचे आढळून आले. ब्रिटनमध्ये प्रचलित असलेल्या ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांतील दोन प्रकारांमध्ये हा विषाणू सापडत नाही.

जुलैमध्ये ब्रिटनमधील यूसीएल, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फ्रान्समधील सिराड आणि रियुनियन युनिव्हर्सिटीने कोरोना विषाणूचा जनुकीय अभ्यास केला आहे. त्यात 99 देशांमधील 46 हजार 723 रुग्णांचे नमुने तपासले. त्यापैकी 12 हजार 706 जणांच्या कोरोना विषाणूंमध्ये जनुकीय बदल झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातील 398 बदल मोठे आणि सतत होत असल्याचं आढळलं. त्यापैकी 1850 बदलांवर संशोधकांनी नजर ठेवली आहे. त्यातून काही धोका वाढण्याचा त्यांना संशय आहे.

कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य : राजेश टोपे

दरम्यान, युनायटेड किंग्डम म्हणजेच UK मध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असल्याचा संशय राजेश टोपे यांनी व्यक्त केलाय. तसेच नागरिकांना आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहनही त्यांनी केलंय. असं असलं तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि येणारी कोरोना लस त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावाही टोपे यांनी केलाय. कोरोना विषाणूच्या नव्या अवताराबाबत पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये संशोधन करण्याचं काम सुरु आहे. याचा योग्य अभ्यास करुन ते आपला अहवाल ICMR ला सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नवा विषाणू किती घातक?

नव्या विषाणूचा फैलाव अधिक गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञही यावर संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप हा नवा विषाणू अधिक घातक असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. या विषाणूमुळे लसीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता नाही, असं तज्ज्ञ म्हणत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील (World Health Organization) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नवा कोरोना व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याचे अजून काहीही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पण ब्रिटनमध्ये ज्या ठिकाणी हा व्हायरस सापडला आहे तिथं संक्रमण दर जास्त आहे, असं WHO नं सांगितलं. तसंच ब्रिटनमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. WHO इमर्जन्सी चीफ माइकल रेयान म्हणाले, “साथीरोगात संयमाने काम करण्याची गरज असते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेकदा एकाच देशात वेगवेगळ्या ठिकाणी संसर्गाच्या दरात फरक असतो. सध्या स्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर नाही. पण या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे.”

हेही वाचा :

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

कोरोनाचा घातक अवतार, महाराष्ट्र किती सज्ज? मुख्यमंत्र्यांकडून आढावा

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, सरकार सतर्क, घाबरु नका

व्हिडीओ पाहा :

Special Story Know all about new Corona strain found in England New Covid-19 Variant

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.