Marathi News International Special thing about Pakistan's most beautiful Minister of State for Foreign Affairs Heena Rabbani Khar
चर्चा तर होणारच ! पाकिस्तानच्या सर्वात सुंदर परराष्ट्र राज्यमंत्री हीना रब्बानी खार बाबतच्या ‘या’ खास गोष्टी
पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील महिला परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार पुन्हा एकादा चर्चेत आल्या आहेत. हिना यांच्या सौंदर्याचे तसेच त्याच्या स्टाईल स्टेटमेंटचे केवळ पाकिस्तनातच नव्हे तर भारतात अन जगभरात अनेक चाहते आहेत. त्यांच्याविषयीची खास माहिती
1 / 7
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील 37 सदस्यांचा नुकताच शपथ ग्रहण सोहळ संपन्न झाला. या शपथग्रहण सोहळ्यानंतर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील महिला परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार पुन्हा एकादा चर्चेत आल्या आहेत. हिना यांच्या सौंदर्याचे तसेच त्याच्या स्टाईल स्टेटमेंटचे केवळ पाकिस्तनातच नव्हे तर भारतात अन जगभरात अनेक चाहते आहेत. त्यांच्याविषयीची खास माहिती या फोटोज मधून
2 / 7
हिना रब्बानी खार यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1977 रोजी मुलतान, पंजाब, पाकिस्तान येथे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. जाट कुटुंबात जन्मलेल्या हिना यांचे वडील गुलाम नूर रब्बानी खार हे प्रसिद्ध राजकीय व्यक्ती होते. तसेच ते खासदारही होते.
3 / 7
हिना रब्बानी यांनी लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) मधून बीएससी इकॉनॉमिक्स ऑनर्स केले आहे. त्यानंतरअमेरिकेतील विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी केले आहे.
4 / 7
2002 मध्ये हिना रब्बानी खार यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी राजकारणात पाऊल ठेवले. मुझफ्फरगडमधून त्या पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांना शौकत अझीझ यांच्या सरकारमध्ये आर्थिक व्यवहार राज्यमंत्री करण्यात आले. 2008 मध्ये तिने पुन्हा निवडणूक जिंकली आणि यावेळी त्यांना केंद्रीय अर्थ आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री बनवण्यात आले होते.
5 / 7
2002 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगच्या बॅनरखाली निवडणूक लढवणाऱ्या हिनाने 2008 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) मध्ये प्रवेश केला होता. येथून त्यांची आणि पीपीपीचे युवा नेते बिलावल भुत्तो यांची जवळीक वाढली. पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांचे प्रेमप्रकरणही खूप गाजले होते.
6 / 7
2011 मध्ये हिना यांना परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले होते. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हिनाच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर हिना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा ही त्यांचे फोटो सगळेकडं व्हायरल झाले होते.
7 / 7
हिना रब्बानी खार केवळ राजकारणातील त्यांच्या भूमिका , विचारामुळे नव्हे तर त्यांचा लूक आणि फॅशनबद्दल अत्यंत सजग असून त्यामध्ये माहीर असलेल्या दिसून येतात.