कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर
कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक-वी ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने केला आहे.
मॉस्को : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. या नव्या कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देश धास्तावले आहेत. मात्र, कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक-वी ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किरिल दिमित्रिक यांनी केला आहे. (Sputnik v vaccine will be effective against the new corona virus strain said RDIF)
रशियातील स्पुटनिक या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक- व्ही ही लस प्रभावी आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन्स झाले असले तरी, स्पुटनिक – व्ही लस नव्या कोरोना विषाणूविरोधात तिचा प्रभाव चांगल्या प्रकारे सिद्ध करत आहे,” असे दिमित्रिज यांनी सांगितलं. तसेच, रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) अॅझेनेका या कंपनीसोबतसुद्धा नव्या कोरोनाशी मुकाबला करणारी प्रभावी लस तयार करण्यावर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नव्या कोरोना व्हायरसमध्ये 17 प्रकारचे बदल
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या नव्या प्रजातीमध्ये कमीतकमी 17 बदल झाले आहेत. या बदलांमुळे कोरोनाच संसर्ग अधिक वेगाने होत आहे. कोरोना व्हायरसमध्ये सर्वात मोठा बदल हा स्पाईक प्रोटीनमध्ये झाला आहे. स्पाईक प्रोटीन कोरोना व्हायरसमधील असा भाग आहे, जो विषाणूला मानवी शरिरात घुसण्यासाठी मदत करतो. याच स्पाईक प्रोटीनमध्ये बदल झाल्यामुळे कोरोनाची नवी प्रजाती घातक असल्याचे सांगितले जात आहे.
LIVE UPDATES | Germany registers 16,643 new COVID-19 cases https://t.co/6XRuYskysI
— Sputnik (@SputnikInt) December 21, 2020
संबंधित बातम्या :
इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?
कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट
(Sputnik v vaccine will be effective against the new corona virus strain said RDIF)