Sri Lanka Crisis : राजपक्षे यांच्यानंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी रानिल विक्रमसिंघे! 134 मतं मिळवत जिंकली राष्ट्रपती निवडणूक
Sri Lanka New President : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विक्रमसिंघे यांनी बाजी मारली.
श्रीलंकेचे (Sri Lanka Crisis) नवे राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. त्यांनी राष्ट्रपती निवडणूक (Sri Lanka President Election 2022) जिंकली असून आता यापुढे श्रीलंकेचा कारभार रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे असणार आहे. सध्या विक्रमसिंघे यांच्याकडे श्रीलंकेचं कार्यवाहर राष्ट्रपदी म्हणून पद देण्यात आलेलं होतं. बुधवारी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विक्रमसिंघे यांनी बाजी मारली. यावेळी श्रीलंकेच्या संसदेत माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे देखील उपस्थित होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेल होता. गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीलंका हलाखीच्या परिस्थितीतून जात असून श्रीलंकेचं अर्थकारण स्थिरस्थावर करण्याचं मोठं आव्हानं आता रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर असणार आहे.
Ranil Wickremesinghe elected as the new President of Sri Lanka: Reuters pic.twitter.com/WGjaLPY0zj
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 20, 2022
134 मतं मिळवत रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. बुधवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. चोख पोलीस बंदोबस्तात यावेळी श्रीलंकेच्या संसदेतील सदस्यांनी मतदान केलं. एकूण 225 जणांपैकी 134 सदस्यांनी रानिल विक्रमसिंघे यांच्या बाजूने मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं.
Acting President Ranil Wickremesinghe is seen voting at the Presidential Election in Parliament. #DailyMirror #SriLanka #SLnews pic.twitter.com/9Vdbhfc0ZI
— DailyMirror (@Dailymirror_SL) July 20, 2022
श्रीलंकन संसदेच्या इतिहासात गेल्या 44 वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणूक घेण्यात आली. अभूतपूर्व आर्थिक संकटात श्रीलंकेची जनता होरपळेतय. असंख्य लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय नेत्यांविरोधात श्रीलंकेच्या जनतेनं पुकारलेल्या बंडानंतर राजपक्षे कुटुंबीयांना देश सोडून जाण्याची वेळ ओढावली होती. अखेर आता राष्ट्रपती निवडणूक जरी पार पडली असली, तरिही भविष्यात मोठ्या संकटांना श्रीलंकन सरकारला तोंड द्यावं लागणार आहे.
श्रीलंकेच्या संसदेत 225 सदस्य आहेत. तर बहुमताचा आकडा 113 आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी 154 मतं घेत निर्विवात श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.