तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर तालिबान्यांनी महिलांच्या बाबतीत अधिक क्रूरपणे वागायला सुरुवात केली आहे. त्यांनी महिलांवर अनेक विचित्र निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थिती देशात महिलांना भयानक वागणूक दिली जात आहे.
तालिबान्यांनी महिलांच्या ड्रायव्हिंग करण्यावर बंदी घातली आहे. अफगाणिस्तान सरकारने फतवा काढला आहे , कि महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही. जेणेकरून त्या ड्रायव्हिंग करू शकणार नाहीत.
याबरोबरच तालिबान्यांनी महिलांच्या हायहिल्सच्या वापरावरही बंदी आणली आहे. एवढंच नव्हे तर महिलांना ज्या चप्पल घालून चालताना आवाज होतो त्या प्रकारच्या चप्पल घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही तालिबान्यांनी महिलांना वाहनातून एकट्याने लांबचा प्रवास करण्यावर बंदी घतली होती. त्यावेळी त्यांनी फतवा काढला होता, की महिलांना 70 किमी पेक्षा जास्तचा प्रवास एकट्याने करता येणार नाही. त्यांना लांबचा प्रवास करण्यासाठी महिलांसोबत पुरुष जोडीदार असणेआवश्यक आहे.
महिलांच्या मेकअप करण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. महिलांना नेलपॉलिश लावण्यसही मनाई करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारमध्ये महिलांवर अश्या कोणत्याही पद्धतीचे बंधन नव्हते.
महिलांना सार्वजनिक स्थानांवर मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. याबरोबरच त्या बाल्कनी मध्ये उभ्या राहू शकत नाहीत. तसेच एवढ्या मोठ्या आवाजात बोलू शकत नाहीत कि, त्यांचा आवाज एखादाअनोळखी व्यक्ती ऐकेल.
अफगाणिस्तानमध्ये महिलांना फोटो काढणे, व्हिडीओ काढणे एवढंच नव्हेतर त्या स्वतः फोटोत येतील व त्या ओळखलया जातील अशी कोणतीहि कृती करण्यास मनाई आहे.
रेडिओ , टीव्ही येथे महिला काम करू शकत नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होत येणार नाही. महिलांच्या उच्च शिक्षणावरही तालिबानने बंदी घातली आहे.