Sheikh Hasina : या विद्यार्थ्याने बांगलादेशात आणली क्रांती, पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा, शेख हसीना यांना चालते व्हावे लागले देश सोडून

Bangladesh Violence : गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या उग्र आंदोलनानंतर बांगलादेशात मोठी उलथापालथ झाली. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात पलायन केले. या विद्यार्थ्यांने बांगलादेशात ही क्रांती आणली आहे.

Sheikh Hasina : या विद्यार्थ्याने बांगलादेशात आणली क्रांती, पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा, शेख हसीना यांना चालते व्हावे लागले देश सोडून
बांगलादेशात शेख हसीना सरकार सत्तेबाहेर
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 9:28 AM

आरक्षणावरुन शेजारील देशात सत्तापालट झाले. बांगलादेशात लवकरच नवीन सरकार आकाराला येईल. पण त्यापूर्वी मोठी घडामोड घडली. सोमवारी राजधानी ढाखा येथे शेख हसीना सरकारच्या निवासस्थानी हजरो आंदोलक घुसले. त्यांचे वडील मुजीबूर रहेमान यांची तसबीर आंदोलकांनी हतोड्याने तोडली. त्यांच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. त्यापूर्वीच शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी भारतात पलायन केले. त्याचा आनंद आंदोलकांनी साजरा केला.

बांगलादेशात आरक्षण विरोधात विद्यार्थी 2018 पासून आंदोलन करत आहे. पण यावेळी मोठी हिंसा झाली. हिसेंचे लोण संपूर्ण देशभरात पोहचले. या आंदोलनापुढे शेख हसीना सरकारला झुकावे लागले. एका विद्यार्थ्याने हे आंदोलन घडवून आणले. नाहिद इस्लाम असे त्याचे नाव आहे. कोण आहे तो? त्याने हे आंदोलन घडवून आणण्यामागील कारण तरी काय?

शेख हसीना यांना केले सत्तेबाहेर

हे सुद्धा वाचा

आरक्षणाच्या आगीत बांग्लादेश गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून होरपळत आहे. नाहिद इस्लाम या आंदोलनाचा चेहरा ठरला. त्याने या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्याच्या उग्र आंदोलनामुळे शेख हसीना या सत्तेबाहेर गेल्या. या विद्यार्थी आंदोलनाचे 156 आयोजक आहेत. नाहिद इस्लाम याने या 4 ऑगस्ट सोजी संपूर्ण असहयोग आंदोलनाची हाक दिली होती. या कालावधीत सरकारसोबत कुठल्या चर्चेस त्याने नकार दिला. देशात आणीबाणी लागू करण्यास विरोध केला. अखेर हतबल झालेल्या शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला.

आहे कोण हा नाहिद इस्लाम?

नाहिद इस्लाम (32) हा ढाका विद्यापीठातील एक विद्यार्थी आहे. त्यांच्या नेतृत्वात बांगलादेशातील तरुणांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात उग्र आंदोलन केले. या आंदोलनात देशभरातील 10 हजारांहून अधिक तरुण सहभागी झाले होते.

या आंदोलनाच्या सुरुवातीलाच 19 जुलै 2024 रोजी नाहिदला अद्यातांनी रात्रीच उचलले आणि त्याला मारहाण केली. विद्यार्थी आंदोलनामागे कुणाचा हात आहे, त्यामागील रसद कुणी पुरवली याची विचारणा केली. 21 जुलै रोजी तो पुरबचैल्फ या पुलाच्या खाली बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला धानमंडी येथील रुग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. तिथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आंदोलन संपविण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला.

नाहिद हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. विद्यापीठात शिकत असताना तो राजकारणाकडे वळला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. अनेक विद्यार्थी त्याच्याकडे आशेने पाहू लागली. त्याच्या विचारांना पाठिंबा मिळाला आणि आज देशात सत्तापालट झाला.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.