Sunita Williams : अंतराळात सुनीता विल्यम्स यांचा नवा विक्रम, काय झाले नेमके ?

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था NASA साल 2025 च्या सुरुवातीलाच SpaceX Crew Dragon स्पेसक्राफ्ट द्वारे दोन्ही अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम राबवू शकते असे म्हटले जात आहे.

Sunita Williams : अंतराळात सुनीता विल्यम्स यांचा नवा विक्रम, काय झाले नेमके ?
sunita williams update
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 1:36 PM

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडल्याने तिच्या सुखरुप पृथ्वीवापसीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दुसरीकडे तिच्या परत आणण्याची जबाबदारी इलोन मस्क यांच्यावर कंपनीवर सोपविण्यात आली आहे. साल 2025 मध्ये सुनीता विल्यम्स अंतराळातून परतणार आहे. अंतराळात अनेक अंतराळवीर यापूर्वी अनेक महिने राहून आलेले आहेत. आता सुनीता विल्यम्स जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. दुसरीकडे सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंद झाला आहे. काय आहे हा विक्रम ते पाहूयात…

नासाच्या सर्वात अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ( ISS ) चे नेतृत्व सांभाळले आहे. ती दुसऱ्यांदा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची लीडर बनली आहे. स्पेस स्टेशनची कॅप्टन म्हणून निवड होण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. सुनीता एक अनुभवी अंतराळवीर असून तिचा अंतराळातील शानदार ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी साल 2012 मध्ये एक्स्पीडीशन 33 दरम्यान सुनीता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची लीडर बनली होती.

भारतीय मूळ असलेली सुनीता विल्यम्स आणि तिच सहकाही बुश विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाईन स्पेसक्राफ्टच्या पहिल्या क्रु फ्लाईटमध्ये स्वार होऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठले होते. 8 दिवसांच्या मिशनवर गेलेल्या स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने दोघे अंतराळवीर यांच्यी पृथ्वीवापसीला फेब्रुवारी 2025 पर्यंत वेळ लागू शकतो असे म्हटले आहे. एवढे महिने स्पेस ट्रॅव्हल्स करुनही सुनीता विल्यम्स यांचे अंतराळ प्रेम जराही कमी झालेले नाहीए. सुनीता म्हणतात की या जागी मला आनंद मिळतो. मला येथे रहायला आवडते.

सुनीता विल्यम्स यांच्यावर नवी जबाबदारी

सुनीता विल्मम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची ही जबाबदारी अधिकृत रित्या रशियन अंतराळवीर Oleg Kononenko यांनी सोपविली आहे. जे लवकरच पृथ्वीवर येण्याची तयारी करायला लागले आहेत. कमांडर झाल्याने आता सुनीता विल्यम्स यांना स्पेस स्टेशनवर होणाऱ्या सर्व मोठ्या एक्टीव्हीटी, ऑपरेशन्स आणि वैज्ञानिक संशोधनाची देखरेख करावी लागणार आहे.

आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट.
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?.
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं...
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं....
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला...
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला....
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.