Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनीता विल्यम्स अंतराळात आरोग्याची काळजी कशी घेतात? जाणून घ्या

Sunita Williams health in space: दोन अंतराळवीर गेल्या सत्तर दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकल्यानं त्यांच्यासाठी जगभरात चिंता व्यक्त केली जातेय. तर त्या कधी पृथ्वीवर परतणार, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, पृथ्वीपासून 254 मैल उंचीवर आपल्या आरोग्याची काळजी त्या कशी घेत आहेत. जाणून घ्या.

सुनीता विल्यम्स अंतराळात आरोग्याची काळजी कशी घेतात? जाणून घ्या
सुनीता विल्यम्स
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 4:05 PM

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर कधी पृथ्वीवर परतणार, याविषयी जगभरात चर्चा होत्ये. कारण, दोन शास्त्रज्ञ गेल्या सत्तर दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स यांचे वजन कमी झाल्याचीही बातमी आली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. आता यातच सुनीता विल्यम्स त्यांच्या तब्येतीची काळजी कशी घेतात, याविषयी माहिती समोर आली आहे.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर गेल्या सत्तर दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत. दोन्ही अंतराळवीरांना नियोजित वेळेपेक्षा जास्त दिवस अंतराळात घालवावे लागणार आहेत. दरम्यान, सुनीता मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतात, याविषयी जाणून घ्या.

सुनीता मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतात?

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुनीता विल्यम्स यांनी ‘नासा’कडून खूप प्रशिक्षण घेतले आहे. अंतराळातील वातावरणातही त्यांना मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणारे विविध व्यायाम आणि थेरपी त्यांना शिकवण्यात आल्या आहेत.

याशिवाय ‘नासा’च्या कम्युनिकेशन सेंटरच्या माध्यमातून त्या वेळोवेळी आपल्या जवळच्या व्यक्तींशी फोन, कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात. जे त्यांना प्रेरित आणि सकारात्मक ठेवते. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांशी बोलण्याची संधीही त्यांना मिळते.

मोहिमेचा कालावधी का वाढला?

जून महिन्यात ते केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. ही मोहिम आता जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बोईंग स्टारलाईनर अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे. त्यांना परत आणण्यात एक अंतराळयान अपयशी ठरले आहे. आता स्पेस एक्स ड्रॅगन्स हे दुसरे विमान फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांना घेण्यासाठी अंतराळात दाखल होणार आहे.

आता तोपर्यंत भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सला ओळखणाऱ्यांना पृथ्वीपासून 254 मैल उंचीवर त्या आपल्या आरोग्याची काळजी कशी घेत आहे, याची चिंता सतावत आहे. पण, काळजी करून नका. नासा देखील वेळोवेळी अंतराळवीरांना आवश्यक त्या गोष्टी पुरवते आणि त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी देखील आवश्यक ते पाऊल उचलत आहे.

दोन्ही अंतराळवीरांसाठी जगभरात चिंता

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकल्यानं त्यांच्यासाठी जगभरात चिंता व्यक्त केली जातेय. तर त्या कधी पृथ्वीवर परतणार, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आता स्पेस एक्स ड्रॅगन्स हे दुसरे विमान फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांना घेण्यासाठी अंतराळात दाखल होणार आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.