Syria War : अबू मोहम्मद अल-जुलानी आहे तरी कोण? बगदादीचा खास फ्रेंड, अमेरिकाच्या पण रडारवर, सीरियात केला तख्तापालट

Abu Muhammad al-Julani Syria : सीरियात तख्तापालट झाला आहे. देशाची राजधानी दमास्कसवर बंडखोरांनी कब्जा केला आहे. हयात तहरीर अल-शाम असे या बंडखोरांच्या गटाचे नाव आहे. त्याचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी हा आहे. तो काही दिवस अल-कायदा या दहशतवादी संघटनेत होता.

Syria War : अबू मोहम्मद अल-जुलानी आहे तरी कोण? बगदादीचा खास फ्रेंड, अमेरिकाच्या पण रडारवर, सीरियात केला तख्तापालट
सीरिया युद्ध
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 3:22 PM

मध्य-पूर्वेतील देश सीरिया हा देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सीरियाची राजधानी दमास्कसववर बंडखोरांनी कब्जा केला आहे. देशात आता पूर्णपणे सत्तांतर झाले आहे. या देशावर आता बंडखोरांनी कब्जा केला आहे. राजधानीत सर्वच बाजूने बंडखोर घुसले आहेत. राष्ट्रपती बशर अल-असद हे देश सोडून गेले आहेत. सीरियात तख्तापालट मागे कुणाचा आहे हात? का करण्यात आले हे सत्तांतर?

अबू मोहम्मद अल जुलानी कोण?

Syria देशात तख्तापालट करणारा नेता म्हणून अबू मोहम्मद अल जुलानी हा समोर आला आहे. हयात तहरीर अल-शाम असे या बंडखोरांच्या गटाचे नाव आहे. त्याचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी हा आहे. तो अल-कायदा या दहशतवादी संघटनेत होता. त्याच्यावर अमेरिकेने वर्ष 2017 मध्ये 84 कोटी 67 लाख रूपयांचे बक्षिस ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

जुलानी याचा जन्म वर्ष 1982 मध्ये सौदी अरबमधील रियाद या शहरात झाला. जन्मानंतर त्याचे नाव अहमद हुसेन अल-शरा असे ठेवण्यात आले. त्याचे वडील सौदीमध्ये पेट्रोलियम इंजिनिअर म्हणून काम करत होते. जुलानी हा 7 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब हे सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्थायिक झाले.

तर जुलानी हा 2003 मध्ये 21 वर्षांचा झाला. तेव्हा तो इराकमध्ये गेला. तिथे तो अल कायदा या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. जुलानी हा बगदादी याचा अगदी जवळचा होता. बगदादीकडे त्याने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सीरियात परतला. 2006 साली इराकमध्ये त्याला अमेरिकेच्या सैनिकांनी पकडले होते. पाच वर्षानंतर त्याला सोडण्यात आले. बगदादी याने त्याच्यावर सीरियातील अल-कायदाची जबाबदारी सोपवली. येथे त्याने अल-नुसरा फ्रंटची सुरुवात केली. 2013 मध्ये बगदादीने अल-कायदाशी संबंध तोडण्याची घोषणा केली. तर इकडे अल-जुलानी हा अल-कायदा सोबत गेला.

काय आहे संघटनेचा उद्देश?

सीरियातील इदलिब हा या बंडखोर, दहशतवाद्यांचा अड्डा झाला. या पट्ट्यात त्यांचा दबदबा तयार झाला. संपूर्ण सीरियावर कब्जा करण्याचे त्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न होते. अल-जुलानी पण इदलिबमध्ये आला. त्याने येथे येताच त्याच्या संघटनेचे अल-नुसरा फ्रंटचे नाव हयात तहरीर अल-शाम असे केले. 2017 मध्ये हजारो तरुणा त्याच्या आवाहनानंतर या ठिकाणी आले. त्याने अनेक छोटे-मोठे गट त्याच्या संघटनेत सामावून घेतले. तेव्हापासून तो सीरियावर कब्जा करण्याची योजना आखत होता. इराणचे तरुणांना देशाबाहेर काढणे आणि सीरियात इस्लामिक कायदा लागू करण्याचा त्याचा उद्देश आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...