तालिबान्यांचं नवीन फर्मान, महिलांनी जिम आणि पार्कमध्ये पायसुद्धा ठेवायचं नाही…

अफगाणिस्तानातील महिलांना जिम, उद्यान आणि शाळेत जाण्यावर आता तालिबान्यांकडून बंदी आणण्यात आली आहे.

तालिबान्यांचं नवीन फर्मान, महिलांनी जिम आणि पार्कमध्ये पायसुद्धा ठेवायचं नाही...
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 10:05 PM

नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील महिलांवर सध्या वाईट दिवस आले आहेत. तालिबान्यांच्या वेगवेगळ्या फर्मानमुळे आता महिलांना जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालिबान्यानी वर्षभरापूर्वी सत्ता हातात घेतल्यापासून महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा नवा हुकूम काढण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी देशातील माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील मुलींच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. तर महिलांना नोकरी करण्यावरही बंदी घालण्यात आली.

तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना डोक्यापासून पायापर्यंत बुरख्याने चेहरा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तालिबान्यांच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लोक तालिबानी सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत.

त्याबरोबरच महिलांनी हिजाब घालण्याबाबतचे नियम पाळले नसल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांना उद्यानात, जिम आणि पार्कमध्ये जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

या आठवड्यापासून हा नियम लागू करण्यात आला आहे. परंतु दुर्दैवाने आदेशांचे पालन केले गेले नसल्याने आणि नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळेच ही बंदी आणली असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

अफगाणिस्तानातील बागेतून फिरताना अनेक महिला आणि पुरुषांना एकत्र फिरताना तालिबान्यांकडून बघण्यात आले. त्यावेळी अनेक महिलानी हिजाब परिधान केला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर जिम आणि बागेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातील महिलांसाठी संयुक्त राष्ट्राचे विशेष प्रतिनिधी अॅलिसन डेव्हिडियन यांनी या बंदीचा निषेध व्यक्त केला आहे.

तालिबानने सार्वजनिक जीवनातील महिलांचा सहभाग संपविण्याचे हे आणखी एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. आम्ही तालिबानला महिला आणि मुलींना सर्व हक्क आणि स्वातंत्र्य बहाल करण्याचे आवाहन करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.

रशियाच्या दौऱ्यावर आलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानातील हा मुद्दा मॉस्को येथे मांडला होता.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....