रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट बनली जगातील सर्वात श्रीमंत गायिका

फोर्ब्जच्या मते 1.6 अब्ज डॉलरच्या नेटवर्थ कमाईने टेलर स्विफ्ट जगातील सर्वात श्रीमंत महिला गायक आणि गीतकार संगीतकार बनली आहे. स्विफ्टने रिहाना हीलाही मागे टाकले आहे.

रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट बनली जगातील सर्वात श्रीमंत गायिका
Taylor Swift
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 2:25 PM

रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट जगातील सर्वात श्रीमंत गायिका बनली आहे.फोर्ब्जच्या यादीनुसार या आठवड्यात टेलर स्विफ्टची संपत्ती 1.6 अब्ज डॉलर झालेली आहे. या आधी रिहानाकडे हा मान होता. फोर्ब्जच्या यादीत रिहाना आता 1.4 अब्ज डॉलर संपत्तीमुळे दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. 34 वर्षीय टेलर स्विफ्ट ही अलिकडे अमेरिकेच्या व्हाईट प्रेसिडेन्ट कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी गेल्याने चर्चेत आली होती. टेलर स्विफ्ट हिच्या गेल्यावर्षीच्या वर्ल्ड वाईट टुर इरास टुर मुळे जगातील सर्वात श्रीमंत म्युझिशियन होण्याचा मान तिला मिळाला आहे. पोसस्टार डाटानुसार या एका टुरमुळे साल 2023 मध्ये स्विफ्टला 1 अब्ज डॉलरची कमाई झाल्याचे म्हटले जाते. आठ महिन्यात 60 शो केल्याने ही कमाई झालेली आहे. या टुरने यंदाही पुन्हा 1 अब्ज डॉलरची कमाई तिला होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑक्टोबर 2023 च्या एका टुरने अमेरिकनक पॉप गायिका स्विफ्टला जगातला सर्वात श्रीमंत महिला कलाकार घडविण्याचा चमत्कार घडला. जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्विफ्ट 2,117 व्या स्थानावर आहे. पॉप स्टार स्विफ्ट टेलर हीने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केलेली आहे.रियल इस्टेटमध्ये 125 दशलक्ष डॉलरची तिची गुंतवणूक आहे. टुर व्यतिरिक्त टेलर स्विफ्टचे अनेक म्युझिक अल्बम आहेत. ज्यमध्ये 11 स्टुडिओ अल्बम आहेत आणि तिच्या पूर्वीच्या गाण्यांची “टेलर व्हर्जन” पुन्हा बाजारात आली आहे, तिच्या वाढत्या संपत्तीमध्ये या अल्बमचे देखील खूप योगदान दिले आहे. तिच्या कॅटलॉगची किंमत आता अंदाजे $600 दशलक्ष इतकी आहे असे फोर्ब्सने म्हटले आहे.

 कोण आहे स्विफ्ट टेलर

टेलर एलिसन स्विफ्ट हीचा जन्म 13 डिसेंबर, 1989 चा आहे. एक अमेरिकन गायक आणि गीतकार असलेल्या टेलर स्विफ्टचा मोठा चाहता वर्ग आहे. स्विफ्टने 2005 मध्ये बिग मशीन रिकॉर्ड्स सोबत करार केला होता.त्यानंतर टेलर स्विफ्ट (2006)आणि फियरलेस (2008) असे तिचे म्युझिक अल्बम बाजारात आले होते. यामुळे एक पॉप गायक म्हणून ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर सोलो अल्बम ‘टियरड्रॉप्स ऑन माई गिटार’, ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘यू बिलॉन्ग विद मी’ या अल्बमला प्रचंड लोकप्रियता मिळाली. स्पीक नाऊ (2010) मध्ये रॉक एण्ड रेड (2012) मध्ये इलेक्ट्रॉनिकसोबत प्रयोग केले. बिलबोर्ड हॉट 100 नंबर-वन सोलो अल्बम तसेच नेव्हर एवर गेटिंग बैक टुगेदर’, ‘शेक इट ऑफ’, ‘ब्लैंक स्पेस’, ‘बैड ब्लड’, आणि ‘लुक व्हाट यू मेड मी’ देखील गाजले.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....