America Joe Biden : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची काय ही अवस्था, बघा जो बायडन धडपडत खाली पडले, Video Viral

| Updated on: Jun 02, 2023 | 1:28 PM

America Joe Biden : अमेरिकन एअरफोर्स अकादमीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी जो बायडन पोहोचले होते. तिथे मंचावरुन लोकांना त्यांना संबोधित करायच होतं.

America Joe Biden : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची काय ही अवस्था, बघा जो बायडन धडपडत खाली पडले, Video Viral
us president Joe biden
Follow us on

न्यू यॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर वाढत्या वयाचा परिणाम दिसून येतोय. एका सार्वजनिक कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नको त्या प्रसंगाला सामोर जावं लागलं. मोठ्या संख्येने प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जे घडलं, ते पाहून सर्वचजण हैराण झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चालता, चालता अचानक धडपडत खाली पडले. बायडेन खाली कोसळताच तिथे उपस्थित असलेले अधिकारी लगेच त्यांच्या मदतीसाठी धावले.

सुदैवाने जो बायडेन यांना गंभीर दुखापत झालेली नाहीय. ते ठीक आहेत. व्हाइट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

कुठे घडली घटना?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जगातल्या शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांची काय ही अवस्था, अशीच भावना अनेकांच्या मनात आली. जो बायडेन अमेरिकन एअरफोर्स अकादमीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी पोहोचले होते. तिथे मंचावरुन लोकांना त्यांना संबोधित करायच होतं. ते स्टेजवर चालता, चालता अचानक खाली पडले.

बायडेन कशामुळे खाली पडले?

जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी बायडेन यांची मदत केली. त्यांना पुन्हा उभं केलं. बायडेन यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. उठून उभे राहिल्यानंतर ते व्यवस्थित चालत होते. बायडेन यांचा पाय सँडबॅगला लागून ते खाली पडले. खाली पडल्यानंतर त्यांनी सँडबँग तिथून काढण्यास सांगितली. त्यांच्या टेलीप्रॉम्पटरसाठी सँडबॅग तिथे ठेवण्यात आली होती. व्हाइट हाऊसकडून ही माहिती देण्यात आलीय.


अलीकडेच मोदींच कौतुक केलेलं

जो बायडेन आता 80 वर्षांचे आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी चिंता सुद्धा व्यक्त केली. अलीकडेच राष्ट्रीय संम्मेलनच्या एका कार्यक्रमात जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्यांनी सर्वांसमोर पीएम मोदी यांची स्वाक्षरी मागितली होती.