अटलांटिक समुद्रात सापडले तरंगत सोने, किंमत तब्बल चार कोटी रुपये, या कारणासाठी होणार वापर
जेव्हा आम्ही याला बाहेर काढले तेव्हा ते एका दगडा सारखे होते. त्याचे वजन 9.5 किलोग्रॅम होते. ज्यावेळी मी त्याला समुद्राच्या बाहेर काढले तेव्हा लोक मला पहात होते. परंतू तेव्हा लोकांना माहीती नव्हते की माझ्या हातात काय आहे ?
माद्रिद : स्पेनच्या केनरी बेटाच्या समुद्र किनाऱ्यावर वैज्ञानिकांना 4 कोटी 46 लाख रुपये किंमतीचे बहुमोल तरंगते सोने सापडले आहे. एका मृत व्हेल माशाचे शव केनरी बेटाच्या किनारी वाहत आले आहे. जेव्हा संशोधकांना या व्हेल माशाला तरंगत येताना पाहिले तेव्हा त्यांना अंदाज आला नाही ही याच्या आतड्यात अनमोल खजाना लपला आहे. जेव्हा संशोधकांनी पोस्टमार्टेम केले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. व्हेल माशाच्या आतड्यात त्याच्या उलटीचा भाग मिळाला असून त्यालाच समुद्रातील तरंगते सोने असे संबोधले जाते.
समुद्राच्या वेगवान लाटा आणि भरतीमुळे या व्हेल माशाच्या पोस्टमार्टे करायला खूपच उशीर लागला. तरीही या व्हेल माशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो असे युनिव्हर्सिट ऑफ लास पाल्मासच्या एनिमल हेल्थ आणि फूड सिक्युरिटी इन्सिट्यूटचे प्रमुख एंटोनिया फर्नांडीस रोड्रीगुएज यांनी सांगितले. ते म्हणाले की पचन तंत्रात समस्या असल्याने या माशाचा मृत्यू झाला. या व्हेलच्या मलाशय आणि आतड्याचा तपास केला असता आत कठोर वस्त अडकलेली दिसली.
तरंगते सोने का आहे दुर्मिळ
जेव्हा आम्ही याला बाहेर काढले तेव्हा ते एका दगडा सारखे होते. त्याचे वजन 9.5 किलोग्रॅम होते. ज्यावेळी मी त्याला समुद्राच्या बाहेर काढले तेव्हा लोक मला पहात होते. परंतू तेव्हा लोकांना माहीती नव्हते की माझ्या हातात काय आहे ? असे एंटोनिया यांनी सांगितले. वास्तविक ती व्हेल माशाची उलटी होती. ती अतिशय दुर्मिळ असल्याने लोक त्याला तरंगते सोने म्हणतात. याचा वापर अनेक वर्षांपासून परफ्युम बनविण्यासाठी होत आला आहे. असे म्हटले जाते की 100 स्पर्म व्हेलपैकी केवळ एकामध्ये हे तरंगते सोने आढळते.
व्हेल म्हणजे देवमासा याच्या उलटीची निर्मिती कशी होते याचे रहस्य 19 व्या शतकात उघड झाले. देवमासा मोठ्या प्रमाणात स्क्विड आणि कटलफिश खातात. त्यापैकी बहुतेकांना ती पचवू शकत नाही, म्हणून मग देवमासा उलटी करतो. त्यानंतरही या उलटीचा काही भाग त्याच्या आता अनेक वर्षे साचून रहातो. त्यापासून Ambergris ची निर्मिती होते. हा पदार्थ मेणासारखा ठोस ज्वलनशील तत्वाचा असतो. हलका राखाडी किंवा काळ्या रंगाचा असतो. काही वेळा हा पदार्थ सापडत नाही तर काही वेळा तरंगताना सापडतो.
ज्वालामुखी पिडीतांना मदत होणार
जे Ambergris ताजे असते त्याचा गंध मैल्यासारख्या असतो. हळूहळू ही उलटी मातीसारखी दिसू लागते. याच्या मदतीने परफ्यूम तयार केला जातो. यापासून तयार परफ्यूम खूप काळापर्यंत सुंगध पसरवत असते. त्यामुळे महागड्या ब्रॅंडमध्ये याचा वापर होतो. लोक त्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात. या उलटीसाठी देवमाशाची शिकार देखील केली जाते. या उलटीला विकून त्या पैशातून पाल्मा ज्वालामुखीच्या पीडीतांना मदत केली जाणार आहे.