Donald Trump : जगासाठी आनंदवार्ता, तो तर बहादूर नेता…डोनाल्ड ट्रम्पवर पुतीन यांचा कौतुकाचा वर्षाव, रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? स्वस्ताईचे युग येणार

Donald Trump Vladimir Putin : अमेरिकेत सत्ता पालटताच रशियाचा सूर बदलला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी कौतुकाचा वर्षाव केला. ट्रम्प हा बहादुर नेता असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्या सुरू असलेली दोन युद्ध लवकरच थांबण्याचा आशावाद व्यक्त होत आहे. ही स्वस्ताईची नांदी आहे का?

Donald Trump : जगासाठी आनंदवार्ता, तो तर बहादूर नेता...डोनाल्ड ट्रम्पवर पुतीन यांचा कौतुकाचा वर्षाव, रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? स्वस्ताईचे युग येणार
डोनाल्ड ट्रम्प, व्लादीमीर पुतीन
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 9:12 AM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. युक्रेन युद्धावरून दोन्ही देशात संबंध ताणल्या गेले होते. अमेरिका आणि नाटोने युक्रेनला रसद पुरवली होती. गेल्या अडीच वर्षांपासून युक्रेन या मदतीवर रशियाशी चिवटपणे झुंज देत आहे. आता पुतीन यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा देत ते एक बहादुर नेता असल्याचा सूर आवळला आहे. जागतिक पटलावरील या नवीन नाट्यमय घडामोडींमुळे रशिया-युक्रेन युद्धच नाही तर मध्य-पूर्वेतील इस्त्रायल-हमास, हिजबुल्लाह, इराण या आघाडीवरील युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही स्वस्ताईची नांदी असल्याचा काही तज्ज्ञांचा दावा आहे.

पुतीन यांनी ट्रम्प यांच्या धैर्याची जमके कौतुक केले. तर ट्रम्प यांच्यावर जुलै महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, त्याला सलामी दिली. “मी, ट्रम्प यांचा त्यावेळचं वागणं पाहिलं आहे. ते धैर्यवान आहेत,” असे कौतुक पुतीन यांनी केले. ट्रम्प यांच्याशी बोलण्यास आणि दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास आपण तयार असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेच्या भूमिकेकडे आमचे लक्ष असल्याची प्रतिक्रिया पुतीन यांनी दिली.

जगात येईल स्वस्ताई

हे सुद्धा वाचा

गेल्या अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्धाने महागाईचा भडका उडला आहे. युक्रेन हा भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. तसा तो इतर देशांसाठी सुद्धा अन्नधान्याचे भांडार आहे. सूर्यफुल, गव्हासह इतर अन्नधान्यासाठी युक्रेन महत्त्वाचा देश आहे. युद्ध थांबल्यास काही वर्षात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होऊन जगाला फायदा होईल. दुसरीकडे इस्त्रायल हा देश हमास, हिजबुल्लाह आणि इराण या तीन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. मध्य-पूर्वेतील हा संघर्ष अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. कच्चा तेलाच्या किंमतींवर त्याचा परिणाम होत आहे. हे युद्ध थांबल्यास तिसऱ्या युद्धाकडे जाणाऱ्या जगाला मोठा दिलासा मिळेल.

पुतीन यांचे मोठे पाऊल

युक्रेन युद्धानंतर अमेरिकेशी रशियाचे चांगलेच वाजले होते. युक्रेनने नाटोची सदस्यता घेतल्याने हा वाद अधिक चिघळला होता. नाटो आमच्या सीमेवर नको अशी पुतीन यांची भूमिका होती. जो बायडेन यांच्या धोरणावर पुतीन नाराज होते. आता त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच पुतीन यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशातील वाद, तणाव निवाळण्यासाठी त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे जगातील बाजारात, व्यापारात आनंदाची लहर उठली आहे.

Non Stop LIVE Update
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.