Violence in Sri Lanka : पंतप्रधान असो की मग मंत्री, श्रीलंकन जनतेच्या रोषापुढे सगळ्यांची राखरांगोळी होत चाललीय….
देशात अन्न, औषध, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आता लोकांच्या सलहनशिलतेचा उद्रेक झाल्यानंतर जमावाने पंतप्रधान राजपक्षेंच्या घराला आग लावली.
श्रीलंका : श्रीलंकेत हिंसाचाराने (Sri Lanka) गेल्या काही दिवसांपासून महागाई आणि हिंसाचाराने (Violence) थैमान माजवले होते. त्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर परिस्थितीपुढे गुडघे टेकत राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत परिस्थिती अधिकच बिघडल्याचे समोर येत आहे. त्यानंतर हिंसाचारात 5 जणांचा बळी गेला होता. तर या हिंसाचारात जमावाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले असल्याचीही माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे. महागाईने (Inflation) इथले लोक त्रस्त झाले आहेत. लोकांना खायला अन्न नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरत आहे. मात्र आता पंतप्रधानांनीच गुडघे टेकल्याने देशाची पुढीची दिशा काय असणार आहे? याचा अंदाजही कुणाला लागत नाहीये. त्यातूनच हा हिंसाचार भडकल्याचे बोलले जात आहे.
Ancestral home of the Rajapaksa family in Medamulana, Hambantota set on fire by protesters. pic.twitter.com/QIEnREphjq
हे सुद्धा वाचा— NewsWire ?? (@NewsWireLK) May 9, 2022
People celebrate Mahinda Rajapaksa’s resignation as Prime Minister.#SrilankaCrisis #SriLanka #LKA #SriLankaProtests pic.twitter.com/bslKzcuStS @AdaDerana_24
— Sri Lanka Tweet ?? ? (@SriLankaTweet) May 9, 2022
महिंदा राजपक्षे यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याचा लोकांनी आनंद साजरा केला.
एका खासदाराचाही मृत्यू
या झालेल्या हिंसाचारात एका खासदाराचाही मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत सोमवारी राजपक्षे बंधूंच्या सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि सरकारचे समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) खासदार अमरकिर्ती अतुकोराला यांना पोलोन्नारुआ जिल्ह्यातील पश्चिमेकडील नितांबुआ शहरात सरकारविरोधी गटाने घेरले होते. त्याचवेळी खासदारांच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली आणि संतप्त जमावाने त्यांना कारमधून बाहेर काढल्यावर त्यांनी पळ काढला आणि एका इमारतीत आश्रय घेतला, असा दावा लोक करतात. खासदाराने स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर या हिंसाचारात जमावाने कोण्या ऐऱ्या-गैऱ्याचे घर जाळले नसून ते पंतप्रधान राजपक्षेंचं यांचे घर आहे. जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना हे पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याने येथे परिस्थिती अधिकच चिघळली आणि लोकांच्या संतापाला पंतप्रधान राजपक्षेंचं तोंड द्यावे लागले. त्यानंतर जमावाने चक्क पंतप्रधान राजपक्षेंच्याच घराला आग लावून टाकली.
A double cab vehicle has been thrown into the Beira Lake by Protesters @news_cutter.#LKA #SriLankaCrisis #SriLanka pic.twitter.com/viJuUFGw9Q
— Sri Lanka Tweet ?? ? (@SriLankaTweet) May 9, 2022
खासदारासह गाडी नदीत
श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचाराने रौद्ररूप धारण केले आहे. यावेळी लोकांच्या मनात राजकर्त्यांविरोधात इतका संताप आहे की लोकांनी पंतप्रधान यांचे घर देखील सोडले नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एका खासदाराकडे वळवला. तसेच लोकांना गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठीही पैसे शिल्लक ठेवले नाहीत, म्हणून एक जमाव खासदाराच्या घराबाहेर जमला. यानंतर लोकांनी रस्त्याबाहेर खासदाराची गाडी अडवली. आणि गाडीत बसलेल्या खासदारासह गाडीच नदीत टाकून दिली.
Video – MP Sanath Nishantha’s house has been set on fire. pic.twitter.com/DJUPUNPCH2 #LKA #SriLanka #SriLankaCrisis
— Sri Lanka Tweet ?? ? (@SriLankaTweet) May 9, 2022
मंत्री नीमल सांजा घराचा ताबा
तापटस झालेल्या जनतेले श्रीलंकेतल्या माजी मंत्री जॉनसन फर्नांडोचं घर आणि कार्यालय जाळल्यानंतर मंत्री नीमल लांजा यांच्या घराचाही ताबा मिळवला. तर महापौर समन लाल फर्नांडोच्या घरालाही आगीच्या स्वाधीन केलं. यातच एका खासदाराचा मृत्यूही झालाचे बोलले जात आहे. तर श्रीलंकेत परस्थिती इतकी बिघडली आहे की, रस्त्यांवर धावणाऱ्या पोलीस गाड्या जमावाकडून तपासल्या जात होत्या तर काहींचे नुकसान राजपक्षे विरोधकांकडून केले जात आहे.
Video- Pro-Government supporters assaulting female protester pic.twitter.com/3Emqfb099z #LKA #SriLanka #SriLankaCrisis
— Sri Lanka Tweet ?? ? (@SriLankaTweet) May 9, 2022
पोलीस अधिकाऱ्याला मारहान
देशात अन्न, औषध, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तर हिंसक आंदोलकांना काबूत आणण्यासाठी मोठ्या श्रीलंकन सैन्यदल प्रयत्न करत आहे . ठिकठिकाणी लष्कर तैनात करण्यात आली आहे. अनके आंदोलकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जखमी सरकारी समर्थकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सैनिकांना जबरदस्तीने रुग्णालये उघडण्यात आले. तर दुसरीकडे आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. एका व्हिडीओत तर आंदोलक कोलंबोचा पोलीस महासंचालकाला पळवून-पळवून मारत असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधानानांच चोराप्रमाणे देश सोडण्याची वेळ
देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना आणि देशात हिंसाचार होत असताना मात्र पंतप्रधानानांच चोराप्रमाणे देश सोडण्याची वेळ आली आहे. एका व्हिडीओत श्रीलंकन सैन्य पंतप्रधानांच्या कुटुंबियांना हेलिपॅडपर्यंत नेत आहेत. दरम्यान त्यांच्या घराबाहेर जमाव जमाला आणि राजपक्षेंच्या घराला आग लावली गेली. आणि त्या रोषातून वाचण्यासाठी पंतप्रधान यांना कुटुंबासहीत देश सोडावा लागला. तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या पंतप्रधानांचं कुटुंब श्रीलंकन नौदलाच्या मदतीनं सुरक्षितस्थळी हलवलं गेलं आहे.
?Passenger Bus at the edge of Beira Lake#SriLankaCrisis #Slnews #lka #Srilankaprotests #SriLankaToday #SriLankaEconomicCrisis #PowerCutLK #SriLankaProtests pic.twitter.com/Qswa18ZLDp
— News Cutter (@news_cutter) May 9, 2022
सरकारी वाहनांची नासधूस
देशात अन्न, औषध, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आता लोकांच्या सलहनशिलतेचा उद्रेक झाल्यानंतर जमावाने पंतप्रधान राजपक्षेंच्या घराला आग लावली. मंत्र्यांच्या घराचा ताबा घेतला. खासदाराचा मृत्यू झाला. यानंतर प्रक्षोभक झालेल्या जमावाने कुठे पोलीस, पत्रकार आणि राजपक्षेंच्या समर्थकांना पकडून बेदम मारहान केली. तर एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत राजपक्षेंच्या मुलाच्या गाड्यांचा ताफा अडवला. इतकेच काय तर जमावाने पंतप्रधान राजपक्षेंच्या घरातील अलिशान गाड्याच्या ताफ्याच आगीच्या स्वाधीन केलं. त्याच्याही व्हिडीओ व्हारल होत आहे.