किम जोंग उनच्या पत्नीच्या गळ्यात दिसला रहस्यमयी नेकलेस, ही कुठली धमकी तर नाही?
जो नेकलेस तीने घातला आहे तो मिसाईल नेकलेस असल्याचे सांगितले जात आहे. यातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याबद्दल हा इशारा देणारा संदेश असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
मुंबई, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (kim jong un Wife) कायमच चर्चेत असतो मात्र यावेळी त्याची पत्नी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तीने गळ्यात घातलेला हार आहे. जो गूढ तर आहेच शिवाय अनेक इशारे देणारा आहे. जो नेकलेस तीने घातला आहे तो मिसाईल नेकलेस असल्याचे सांगितले जात आहे. यातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याबद्दल हा इशारा देणारा संदेश असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
75व्या लष्करी समारंभ चर्चेत
खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग-उनची पत्नी री सोल-जू क्वचितच लोकांसमोर आली असली तरी, जेव्हा ती येते तेव्हा ती चर्चेचा विषय बनते. या वेळी ती गेल्या बुधवारी उत्तर कोरियाच्या 75 व्या लष्करी समारंभात दिसली होती. तिने आपल्या पती आणि मुलीला सामील करून घेतले आणि आपल्या हारातून जगाला सावध केले.
अणुऊर्जा बद्दल अनोखा संदेश
रिपोर्ट्सनुसार, तीच्या गळ्यात क्षेपणास्त्राचा हार दिसत आहे. असे करून त्यांनी उत्तर कोरियाच्या अणुशक्तीबाबत अनोखा संदेश दिला आहे. कार्यक्रमातील प्रमुख लष्करी परेडपूर्वी त्याच्या गळ्यात हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या आकाराचे लटकन दिसले. हे परिधान केल्यानंतर सट्ट्याचा बाजार तापला आहे. विविध दावे केले जात आहेत.
आण्विक हल्ला करण्यास सक्षम
एका मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या नेकलेसचा आकार उत्तर कोरियाच्या सर्वात मोठ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र ह्वासांग 17 ICBM सारखा आहे. हे एक असे क्षेपणास्त्र आहे ज्याबद्दल असे म्हटले जाते की, ते अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आण्विक हल्ला करण्यास सक्षम होते. हे क्षेपणास्त्र केवळ अमेरिकेसाठीच बनवण्यात आले होते, असेही मानले जाते.