नेपाळ-चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली ! उंची वाढली की कमी झाली?
नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे मोजमाप माउंट एव्हेरेस्ट या पर्वताची उंची 8848.86 मीटर असल्याचं सांगण्यात आलं आहे. (new height Mount everest)
नवी दिल्ली : मागील कित्येक दशकांपासून वादाचा मुद्दा असलेल्या जगातील सर्वांत उंच शिखर म्हणजेच माऊंट एव्हरेस्टची उंची शेवटी निश्चित करण्यात आली आहे. नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे मोजमाप केलेल्या या शिखऱाची उंची 8848.86 मीटर असल्याचं सांगण्यात आलं आहे. हीआकडेवारी नेपाळ सरकारने मंगळवारी (8 डिसेंबर) अधिकृतपणे जाहीर केली. यापूर्वीच्या मोजमापापेक्षा एव्हरेस्टची उंची 86 सेंटीमीटरने वाढली आहे. (the new height of Mount everest declared by nepal and china)
जगातले सर्वांत उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्टची ख्याती आहे. सर्वात उंच अशी बिरुदावली मिळाल्यामुळे प्रत्येकाला या शिखराची उंची नेमकी किती असावी याबद्दल नेहमीच उत्सुकता लागगेली असते. कदाचित त्यामुळेच माऊंट एव्हरेस्टची उंची हा वादाचाही मुद्दा राहिलेला आहे. त्यानंतर, आता नेपाळने या शिखराची उंची 8848.86 मीटर (29031 फूट) असल्याचं सांगतिलं आहे. ही उंची नेपाळमधील काठमांडू आणि चीनमधील बिजिंग शहरातली एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. यावेळी नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी उपस्थित होते.
It’s official. Mount Everest is 8,848.86 metres tall
The new height announced jointly by Nepal and China puts an end to the one constantly asked question: How tall is the world’s highest mountain? https://t.co/JpbqdvyYed — by @sangamprasai
— The Kathmandu Post (@kathmandupost) December 8, 2020
यावर बोलताना, नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एव्हरेस्टची उंची 86 सेंटीमीटने वाढल्याचं सांगितलं. तसेच, माऊंट एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यांनतर लगेच चीनचे परराष्ट्रमंत्रीर वांग यी यांनीसुद्धा ही अधिकृत घोषणा केली.
याआधी मोजमाप कधी? उंची किती?
माउंट एव्हरेस्ट उंची हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. 1847 पासून या शिखराचे अचूक मोजमाप करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, नैसर्गिक बदलांमुळे, हीमस्खलन, भूकंपामुळे एव्हरेस्टच्या उंचीत नेहमीच कमीअधिक बदल झाला.
- 1847- ब्रिटनभारत उंची- 8778 मीटर
- 1849-1850 ब्रिटन-भारत उंची- 8840 मीटर
- 1946-1953 भारत – उंची – 8848 मीटर
- 1966-1968 चीन – उंची- 8850.32 मीटर
- 1975 चीन – उंची-8848.13 मीटर
- 2004 इटली – उंची- 8848.5 मीटर
- 2005 चीन – उंची- 8844.43 मीटर
- 2020 नेपाळ-चीन – उंची- 8848.86 मीटर
भारताने सांगितलेली उंची सर्वमान्य
एव्हरेस्टची उंची मोजण्याचा आतापर्यंत अनेक देशांनी प्रयत्न केलेला आहे. चीन, नेपाळ,अमेरिका, इटली अशा अनेक देशांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजलेली आहे. मात्र, भारताने 1954 साली मोजलेल्या उंचीला बहुतांश देशांनी मान्यता दिली आहे. भारताने माऊंट एव्हरेस्टची उंची ही 8848 मीटर म्हणजेच 29028 फूट असल्याचं 1954 साली सांगितलं होतं. ही मोजणी करण्यासाठी भारताने त्रिकोणमितीचा (trigonometry) वापर केला होता.
संबंधित बातम्या :
Akola | हिरवाईचा शालू नेसलेला सातपुडा …
Satpura Mountain Range | हिरवाईचा शालू …
घटनेतील तरतूद सांगणं म्हणजे धमकी …
(the new height of Mount everest declared by nepal and chin