Viral Video : ‘या’ देशातील पंतप्रधान पार्टीत मनसोक्त नाचली; प्रायव्हेट व्हिडीओ पब्लिक झाल्याने त्रस्तही झाली
2019 मध्ये फिनलंडच्या सना मरिन ह्या पंतप्रधान झाल्या आहेत. शिवाय त्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या आहेत की, "हा व्हिडिओ खासगी असून एका खासगी जागेत शूट करण्यात आला आहे.
मुंबई : (Social Media) सोशल मिडियामुळे खासगी जीवनही राहिले नाही. प्रत्येक बाब ही समाज माध्यमापासून लपून राहत नाही, असाच प्रकार (Finland) फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांच्याबाबतही घडला आहे. एका पार्टीमधला डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, याबद्दल आपण व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हा (Video Viral) व्हिडिओ फक्त मित्रांना बघण्यासाठी होता, असं त्याचं म्हणणं आहे. हा दोन मिनिटांचा व्हिडिओ समाज माध्यमासमोर आल्याने 36 वर्षीय मरीन ह्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ती लोकप्रिय स्थानिक प्रभावकार आणि कलाकारांसोबत पूर्ण पार्टी मूडमध्ये नाचताना आणि गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ आगोदर फिनलंडच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या क्लिप्स एका खासगी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आल्या होत्या.
व्हिडिओ बद्दल काय म्हणाल्या पंतप्रधान मरिन?
2019 मध्ये फिनलंडच्या सना मरिन ह्या पंतप्रधान झाल्या आहेत. शिवाय त्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या आहेत की, “हा व्हिडिओ खासगी असून एका खासगी जागेत शूट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या समोर आल्याने मला खूप राग आला आहे,’ असं म्हणत त्यांनी हे व्हिडिओ कोणी लीक केले हे मला माहित नाही. फिनलंडमधील अनेकांनी या तरुण नेत्याला तिचे वैयक्तिक आयुष्य हायप्रोफाइल करिअरने जगण्याचे समर्थन केले आहे.
FINLAND’S PM pic.twitter.com/lFzsMVnKgz
— The_Real_Fly (@The_Real_Fly) August 18, 2022
व्हिडिओ व्हायरल मागे राजकारण
एका खासगी पार्टीमधला व्हिडिओ व्हायरल करणे हे चुकीचे आहे. या पार्टीमध्ये अनेकांनी दारु पिलेली होती. पण कोणी ड्रग्ज घेतले नव्हते असेहा मरिन म्हणाल्या आहेत. मात्र, पार्टी एवढी रंगात आली की, असा व्हिडिओ कोणी काढला याबद्दल माहिती नाही. मात्र, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा वापर करता येईल असा उद्देश विरोधकांचाही असू शकतो असेही त्या म्हणाल्या आहेत. याबाबत आपल्याकडून कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
व्हिडिओची माहिती पण …
पार्टीमधील व्हिडिओ बद्दल आपल्याला माहिती होते पण ती एक खासगी पार्टी होती त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला याची माहितीही नाही. मात्र, हा जुना व्हिडिओ असून याबद्दल कोणी राजकारण केले तर त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.