Video : आता कुत्रे कोरोनाचा शोध घेणार, थायलंड विद्यापीठाचा दावा, पहा प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ
कुत्र्याच्या मदतीने कोरोनाग्रस्तांना ओळखता येऊ शकतं, असा दावा थायलंडच्या विद्यापीठाने केलाय. (sniffer dog corona virus)
बँकॉक : जगभरात कोरोनाने थैमान ( corona virus) घातले आहे. विचार करायचं झालं तर कोरोनाची लागण झाल्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून जगभरात अनेक संशोधनं केली जात आहेत. अनेक संस्थांकडून लसींची निर्मिती केली जात आहे. तर काही ठिकाणी कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना चाचणी आणखी किती सहज आणि सोपी होऊ शकते, यावर अभ्यास सुरु आहे. या पार्श्वभूमीवर थायलंड विद्यापीठाने कोरोना रुग्णांना ओळखण्यासाठी एक नवा प्रयोग केला आहे. या प्रयोगानंतर कुत्र्याच्या मदतीने कोरोनाग्रस्तांना ओळखता येऊ शकतं, असा दावा थायलंडच्या विद्यापीठाने केलाय. या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओसुद्धा सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. (the sniffer dog now will detect the corona virus covid 19 by sniffing the human sweat)
थायलंड विद्यापीठाचा दावा काय?
एक प्रशिक्षित स्निफर कुत्रा कोरोनाग्रस्ताला ओळखू शकतो, असा दावा थायलंड विद्यापीठाने केलाय. एक स्निफर कुत्रा (sniffer dog) शरीरातील घामाचा वास घेऊन कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे सांगू शकतो. हा प्रयोग करताना स्निपर कुत्रे कोरोना विषाणूला ओळखण्यासाठी 95 टक्के यशस्वी राहिल्याचं सांगितलं जात आहे. हा प्रयोग करताना सहा लॅब्राडोर रिट्रीव्हर्स कुत्र्यांना तब्बल सहा महिने प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर एका फिरत्या चाकावर सहा माणसांच्या घामाचे सॅम्पल ठेवण्यात आले. यामध्ये काही सॅम्पल हे कोरोनाग्रस्तांचे होते. तर काही घामाचे सॅम्पल हे कोरोना नसलेल्या व्यक्तीचे होते. हा प्रयोग करताना, प्रशिक्षित कुत्र्यांनी कोरोनाग्रस्ताचा घाम म्हणजेच कोरोनाग्रस्ताला बरोबर ओळखले आहे. कोरोनाग्रस्तास ओळखण्याचे हे प्रमाण 95 टक्के असल्याचं थायलंड विद्यापीठानं म्हटलंय.
कोरोनाचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांचा वापर गेला जाणार आहे, त्यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले, पाहा व्हिडीओ :
विषाणूला शोधण्यासाठी फक्त दोन सेकंद
या प्रकल्पाविषयी बोलताना थायलंड विद्यापीठाच्या पशुवैद्यक शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आणि या प्रकल्पाच्या प्रमुख प्रोफेसर कायवाली चटदारॉन्ग (Professor Kaywalee Chatdarong) यांनी याविषयी अधिक सांगितले आहे. आमचा हा प्रयोग यशस्वी झाला असून प्रशिक्षित कुत्र्याला कोरोना व्हायरस शोधायला फक्त दोन सेकंद लागतात, असा दावा प्रोफेसर कायवाली यांनी केलाय. तसेच प्रशिक्षित कुत्रा एका मिनिटात माणसाच्या घामाचे तब्बल 60 नमुने तपासू शकतो असेही त्यांनी सांगतिलंय. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णास लक्षणं नसली तरी रुग्णाच्या घामातील व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंडच्या ( volatile organic compound) मदतीने प्रशिक्षित कुत्रा कोरोना विषाणूला शोधू शकतो, असंही या प्रोफेसर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता या कुत्र्यांचा उपगोय कोरोनाग्रस्तांची ओळख पटवण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कुत्र्यांना प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन कोरोनाग्रस्तांचा शोध घेतला जाईल. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी या कुत्र्यांचा जास्त उपगोय होईल असे सांगण्यात येतेय. चीन, फिनलंड तसेच भारतानेसुद्धा स्निफर डॉगच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण शोधण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे.
इतर बातम्या : Corona Update : देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती?
(the sniffer dog now will detect the corona virus covid 19 by sniffing the human sweat)