पाकिस्तानच्या संसदेत हिंदुस्थानचे गोडवे; भारताच्या गरुड भरारीची जमके तारीफ
Pakistan Parliament : पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या कौतुकाचे पूल बांधण्यात आले. पाकिस्तानचा कट्टर धार्मिक नेत्याने देशातील राजकारण्यांना आरसा दाखवला. त्याने भारताने जागतिक महाशक्ती होण्याकडे मोठी झेप घेतल्याचे सांगत, आपल्या हातात भीक मागण्याची वेळ आल्याचे दुःख उगळले. काय म्हणाला हा नेता...
पाकिस्तानचा कट्टर धार्मिक नेता मौलाना फजल ऊर रहेमान याने पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केला. पाकिस्तानच्या सोशल मीडियात भारताच्या प्रगतीने सर्वसामान्य नागरिकांचे डोळे दिपवल्याचे दिसून येते. पण आता कट्टर धार्मिक नेते पण भारताचे गोडवे गायला लागले आहेत, ते पण पाकिस्तानच्या संसदेत. भारत एकीकडे जागतिक महाशक्ती होण्याचा जवळ पोहचला आहे तर पाकिस्तान दिवाळखोरी वाचविण्यासाठी भीक मागत असल्याचा आरसा मौलानाने पाकिस्तानच्या नेत्यांना दाखवला.
जोरदार भाषणाने सर्वच मंत्रमुग्ध
जमीयत उलेमा-ए-इस्लाम फजलचा (JUI-F) प्रमुख मौलाना रहेमान यांनी नॅशनल असेम्बलीत जोरदार भाषण केले. 2018 मधील पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूकीवर रहेमान यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी आताच्या सार्वत्रिक निवडणुकीवर पण आक्षेप नोंदवला. जर त्यावेळेच्या निवडणुकीत गडबड झाली होती, तर आताच्या निवडणुकीत ती गडबड का नाही झाली? असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाज) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारला त्यांनी आग्रह केला की संसदेत बहुमत आहे तर PTI ला सरकार तयार करण्याची परवानगी द्यायला हवी. त्यांनी दोन्ही पक्षांना विरोधकांच्या बाकड्यावर बसण्याचे आवाहन केले.
#BREAKING: Top Pakistani Politician Maulana Fazal Ur Rehman inside Pakistan Parliament says while India is inching closer to become a Global Superpower, Pakistan is begging before the world to save it from devastation. Rehman also takes an indirect dig at the Pakistan Army. pic.twitter.com/c1euemAtVM
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 29, 2024
संसदेत भारताचे कोडकौतुक
आपल्या भाषणात त्यांनी भारतासोबतच्या अनेक समान गोष्टींवर भर दिला. भारतासह पाकिस्तानला सोबतच स्वातंत्र्य मिळाले. दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले. पण आज भारत महाशक्ती होण्याचे स्वप्न पाहत आहे. तर पाकिस्तान दिवाळखोर होऊ नये यासाठी भीक मागत आहे. पाकिस्तानविषयीचे निर्णय दुसरा कोणी तरी घेतो आणि त्यासाठी पाकिस्तानमधील राजकारण्यांना दोषी ठरविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचा संसदेतील भाषणाचा व्हिडिओ पाकिस्तानच्या सोशल मीडियावर आणि भारतीय सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मौलानाचा आरोप काय
मौलाना फजल ऊर रहेमान याचा पक्ष JUI-F हा पीटीआयचा कट्टर विरोधक होता. त्याने इमरान खान यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्यासाठी पाकिस्तानमध्ये मोठी रॅली सुद्धा काढली होती. हे सरकार गडगडल्यानंतर JUI-F तिथल्या आघाडी सरकारचा भाग झाले. आताच्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र या पक्षाने वेगळे धोरण स्वीकारले. या पक्षाने जुने साथीदार पीएमएल-एन आणि पीपीपी सोबतचे राजकीय नाते संपवले. त्यांच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच निवडणुकीत गडबडीचा आरोप करण्यात येत आहे.