ग्लोबल वार्मिंग पुढील पाच वर्षात धोकादायक पातळी पार करणार, यूएनने सांगितलं पृथ्वीवर काय बदल होणार
उन्हाचे प्रमाण वाढेल. कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवेल. पाण्याची कमतरता जाणवेल. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल. पावसाळ्यात उन्ह पडू शकेल.
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राने पुन्हा एकदा ग्लोबल वार्मिंगवरून जगाला इशारा दिला. पुढील पाच वर्षांत ग्लोबल वार्मिंग खतरनाक १.५ सीची सीमा पार करेल, असा रिपोर्ट यूएनने दिला आहे. अल निनो आणि जलवायू परिवर्तनामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतील. यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. संयुक्त राष्ट्राने भविष्यवाणी केली की, येणाऱ्या काळात वैश्विक तापमान वाढेल. पॅरीस कराराची १.५ डिग्री सेल्सिअसची सीमा ओलांडली जाईल. आतापासून यावर विचार केला नाही आणि नियंत्रण मिळवले नाही, तर याचे खतरनाक परिणाम भोगावे लागतील.
उद्योगधंद्यांचा दुष्परिणाम
संयुक्त राष्ट्राच्या विश्व मौसम विज्ञान संघटनेने (डब्ल्यूएमओ) वार्षिक आकलन सादर केला. यात या खतऱ्याचा इशारा देण्यात आलाय. डब्ल्यूएमओनुसार, दरवर्षीची परिस्थिती असं सांगते की, ६६ टक्के खतरा वाढणार आहे.
वैज्ञानिकांनी दिला इशारा
१.५ सीची सीमा पार केल्यास जोखीम आणखी वाढेल. जलवायू परिवर्तनाचा खतरा वाढेल. मसलन ग्रीनलँड आणि वेस्ट अंटार्कटिक बर्फाची चादर विरघळू शकते. उन्हाचे प्रमाण वाढेल. कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवेल. पाण्याची कमतरता जाणवेल. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल. पावसाळ्यात उन्ह पडू शकेल.
पॅरीस कराराचा धोका
सुमारे २०० देशांनी २०१५ मध्ये पॅरीस करारात वैश्विक तापमान वाढ १.५ सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचा संकल्प केला. परंतु, परिस्थिती अशी आहे की, हा संकल्प पूर्ण होताना दिसत नाही. येणाऱ्या काळात अल निनो विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे वैश्विक तापमान वाढेल. आरोग्य, अन्नसुरक्षा आणि पाणी तसेच पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होईल.
अल निनो कसा येतो
गरम हवा पाण्याला दक्षिण अमेरिकेवरून प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे ढकलते. यामुळे पणी अधिक गरम होतो. हे पाणी जगातील जलवायूला प्रभावित करते. दक्षिण अमेरिकेत पाऊस पडेल. तर, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, उत्तर चीन आणि पूर्वोत्तर ब्राझीलसारख्या क्षेत्रात कोरडा दुष्काळ पडेल.