Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: जागतिक आरोग्य संघटनेकडून आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी

ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. | Pfizer and BioNTech vaccine

मोठी बातमी: जागतिक आरोग्य संघटनेकडून आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 9:21 AM

जिनिव्हा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर व बायोएटनेक ( Pfizer-BioNTech) यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे.  यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. (WHO lists the COVID19 vaccine from Pfizer and BioNTech for emergency use)

तर दुसरीकडे आता भारतात केंद्र सरकारकडून सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर फायझरकडूनही आपातकालीन वापरासाठी लशीला परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीची गुरुवारी बैठक झाली होती.

या बैठकीनंतर नववर्षात काही तरी आपल्या हाती पडू शकेल, इतकेच मी आपल्याला सूचित करू शकतो, असे वक्तव्य औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी केले होते. त्यामुळे केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशिल्ड’ (covishield) आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ (covishield) या लसींना हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता दाट शक्यता आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने फायझरला हिरवा कंदील दाखवल्याने भारतातही या लशीच्या वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

फायझर या कंपनीने लस निर्मितीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. फायझरची लस ही ९५ टक्क्यांहूनही अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी देशव्यापी ड्राय रनची घोषणा

केंद्र सरकारने 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्याची घोषणाही केली. त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

COVID-19 vaccine: कोरोनाच्या लशीची आज घोषणा? तज्ज्ञ समितीच्या सदस्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ 2 जानेवारीला; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

(WHO lists the COVID19 vaccine from Pfizer and BioNTech for emergency use)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.