अमेरिका : एक अजब घटना अमेरिकेत (America) घडली असल्याचं समोर आलं आहे. चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका महिलेला एक दोन नव्हे, तर तब्बल 15 कोटी रुपये मिळणार आहेत. ‘न्यूयॉर्क पोस्ट’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ज्या महिलेला इतकी जबरदस्त रक्कम मिळणार आहे, त्या महिलेवर चोरीचा आरोप (Allegations on ) करण्यात आला होता. यानंतर तिला स्थानिक पोलिसांनी अटकदेखील केली होती. अमेरिकेतील एक मल्टिनॅशनल कंपनी वॉलमार्टला या महिलेला 15 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. असं नेमकं या महिलेलं केलं तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरंतर या महिलेवर 48 डॉलर म्हणजेच जवळपास 3 हजार 600 रुपये इतक्या किंमतीचं सामान चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरुन या महिलेला पोलिसांनी अटक (Police arrest) केली होती. पण या महिलेनं आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आव्हान दिलं.
कोर्टात याप्रकरणी खटला चालला. या खटल्याचा आता निकाल लागला असून कोर्टानं या महिलेला दिलासा देत असतानाच ज्यांच्यामुळे तिला तुरुंगात जाण्याची वेळ आली होती, त्या कंपनीनला चांगलाच दणकाही दिलाय. आता कोर्टानं वॉलमार्टला या महिलेला तब्बल 15 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं नाव लेस्ली नर्स असं आहे. या महिलेला 2016 साली अटक करण्यात आली. तिच्यावर चोरीचा आळ घेण्यात आला होता. वॉलमार्टमध्ये ती खरेदीसाठी केली होती. जेव्हा ती सामान खरेदी केल्यानंतर बाहेर येत होती, तेव्हा तिला रोखण्यात आलं. यावेळी तिला थांबवून तिनं चोरी केली असल्याचा आरोप करण्यात आला. वॉलमार्ट स्टोअरमधून तिनं सामानाची चोरी केली असल्याचा संशय तिच्यावर घेण्यात आला. यानंतर तिला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.
महिलेच्या म्हणण्यानुसार 3,600 रुपयांची खरेदी केली होती. याचं बिलही महिलेनं भरलं होतं. पण अटक करण्यात आलेल्या महिलेलं आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्यावरुन कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर तिला धमकावण्यातही आलं. तिला वेगवेगळ्या नोटिसा पाठवण्यात आल्या.
3600 रुपयांच्या बदल्यात 15 हजार रुपये दंड भरण्यासाठी या महिलेला नोटीस पाठवण्यात येत होत्या. या सगळ्याला वैतागून अखेर आपल्यावर खोट्या आरोपांविरोधात या महिलेलनं कोर्टात धाव घेतली. 2018 साली लेस्लीनं वॉलमार्टविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. यावेळी कोर्टात झालेल्या युक्तिवाद आणि सुनावणीनंतर निकाल हा महिलेचा बाजूनं लागला. या निकालानं वॉलमार्टला चांगलाच दणकाही दिला. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आता वॉलमार्टला 2.1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 15 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही या महिलेला दंडाच्या रुपात द्यावी लागणार आहे. अर्थात वॉलमार्टही या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात आव्हान देऊ शकतं.
लेस्लीनं केलेल्या आरोपानुसार वॉलमार्टकडून अनेकदा ग्राहकांवर खोटे आरोप लावून त्यांना लुबाडलं जातं. पण याविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला मात्र कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. इतकंच काय तर तिला मालामाल होण्याची संधीदेखील यामुळे निर्माण झाली आहे.
VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!
लज्जास्पद! 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, डोंबिवलीत वॉर्डबॉयला अटक
मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा