‘त्या’ महिलेला अखेर 16 वर्षाची जेल? असं आपल्याकडे करायचं ठरवलं तर? वाचा संपूर्ण प्रकरण
मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून चालकाच्या तोंडावर खोकणाऱ्या महिलेला तब्बल 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील (America) सॅन फ्रांसिस्कोमध्ये (San Fransisco) उबर राईड (Uber Ride) दरम्यान चालकाने महिला प्रवाशाला मास्क घालण्यास सांगितले. यावर आरोपी महिलेने चालकाचा मास्क हिसकाऊन घेत फाडला आणि प्रवासात चालकाच्या तोंडावर खोकली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. आता या महिलेला या कृत्यासाठी तब्बल 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. तसेच 3 हजार डॉलर म्हणजे जवळपास 2 लाख 17 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे (The women who cough on Uber driver after asking to wear mask in America may go in jail).
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत उबेर कारने प्रवास करणारी एक महिला मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून चालकाच्या तोंडावर खोकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात आरोपी महिला चालकासोबत अपमानजनक वर्तन करत असल्याचंही समोर आलं. संबंधित चालक मुळचा नेपाळमधील रहिवासी असून नोकरीनिमित्ताने तो अमेरिकेत आहे. सध्या युरोपीयन देशांमध्ये आशियातील नागरिकांविरोधात वर्णभेदी शेरेबाजी आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे या व्हिडीओवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अखेर स्थानिक पोलीस प्रशासनाने या महिलेविरोधात गंभीर गुन्हे दाखल केलेत.
नेमकं काय घडलं होतं?
UBER RIDERS COUGH ON, ASSAULT, PEPPER SPRAY DRIVER Driver Subhakar Khadka, who is South Asian, says he believes he was targeted because of his race. He picked up 3 women in the Bayview yesterday afternoon on San Bruno Avenue. https://t.co/Tzr7kTfyKQ pic.twitter.com/f8PiHDZ9CZ
— Betty Yu (@BettyKPIX) March 9, 2021
आरोपी महिलेचं नाव अरना किमियाई (Arna Kimiai) असं आहे. ती संपूर्ण प्रवासात सुभाकर खडका (Subhakar Khadka) नावाच्या उबर चालकाच्या तोंडावर खोकत राहिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिने केलेली ही कृती अत्यंत गंभीर मानण्यात आलीय. त्यामुळेच तिच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेत. या गुन्ह्यांमध्ये ती दोषी सिद्ध झाल्यानंतर तिला तब्बल 16 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सॅन फ्रांसिस्कोमधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात आरोपी महिला किमियाई तिच्या मित्रांसोबत विनामास्क उबर कारमध्ये बसते आणि मास्क घालण्यास सांगितल्यानंतर चालकाशी हुज्जत घालताना दिसली.
8 वर्षांपूर्वी चालक खडका नोकरीसाठी अमेरिकेत
खडकाने सांगितलं की संबंधित महिलेने वर्णभेदी शेरेबाजीही केली. तसेच कारमधून उतरताना कारमध्ये पेपरस्प्रे मारला. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, “खडका 8 वर्षांपूर्वी नेपाळमधून अमेरिकेत आले होते. किमियाईचं मूळ देखील अमेरिकन नाही. ती इराणीवंशीय आहे.
हेही वाचा :
मुंबई एपीएमसीत मास्क घेण्यासाठी कोरोना नियम धाब्यावर, संचालकही फोटो काढण्यात मग्न
Ahmednagar Corona Update | महिनाभरात 83 लाखांचा दंड वसूल, अहमदनगरमध्ये 66 हजार नागरिकांवर कारवाई
VIDEO | आमच्या कुंदा वहिनी वयस्कर, राजसाहेब एक विनंती करते, महापौरांनी हात जोडले
व्हिडीओ पाहा :
The women who cough on Uber driver after asking to wear mask in America may go in jail