Pashupatinath Temple : जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला ही सोडले नाही, इतके किलो सोने केले लंपास

Pashupatinath Temple : जगभरातील हिंदूचें पवित्र श्रद्धास्थान पशुपतिनाथ मंदिरातील सोने चोरीला गेले आहे. भाविकांनी दान केलेले सोने अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाविकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे, इतके किलो सोने चोरीला गेले आहे.

Pashupatinath Temple : जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला ही सोडले नाही, इतके किलो सोने केले लंपास
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 3:31 PM

नवी दिल्ली : नेपाळमधील काठमांडू येथील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरातील (Nepal Pashupatinath Temple) सोने चोरीला गेले आहे. यामुळे जगभरातील भाविकांना धक्का बसला आहे. सोने गायब (Gold Theft) झाल्याचे वृत्त 25 जून रोजी पसरले. प्रशासनाने तातडीने मंदिर बंद केले. मंदिर बंद असल्याचे पाऊन अनेक भाविकांना धक्का बसला. पण खरे कारण समोर आल्यावर सर्वांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मंदिर परिसरात नेपाळी लष्कर (Nepali Army), पोलीस (Nepal Police) आणि सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्यात आले. अनुचित प्रकार थांबविण्यासाठी आणि तपास कार्यात अडथळा येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय करण्यात आला. पण जगभरातील भाविकांनी ही घटना समोर येताच रोष व्यक्त केला.

इतके सोने चोरीला पशुपतिनाथ मंदिरात भगवान महादेवाला अर्पण केलेले 10 किलो सोने गायब आहे. हे सोने कोणी चोरले. कसे चोरले, कधी चोरले असे अनेक प्रश्न आता तपास यंत्रणेसमोर आहे. वाऱ्यासारखी ही वार्ता फैलताच, नेपाळ लष्कर पोलिस तसेच सशस्त्र दल तातडीने पाचारण करण्यात आले. भगवान पशुपतिनाथाचे दर्शन बंद करण्यात आले. लाचलुचपत तसेच इतर आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी एजन्सी CIAA ने मंदिर परिसरात तपास सुरु केला. त्यांच्यासोबत विविध विभागाचे अधिकारी हजर होते. या पथकाने तातडीने तपासाची सूत्र हाती घेतली. पण तोपर्यंत बाहेर भक्त, भाविक मोठ्या संख्येने जमले होते.

सोने खरंच चोरीला गेले की… 2021 मध्ये पशुपतिनाथ मंदिरात जलहरी रुपात भगवान भोलेनाथाची पुजा बांधली गेली. त्यावेळी 108 किलो सोने चढविण्यात आले. त्यातील 10 किलो सोने गायब झाले. भगवान शंकराला अर्पण करण्यात आलेल्या 108 किलो सोन्याची कथा मोठी रोचक आहे. पण सध्या हे दहा किलो सोने गेले कुठे असा सवाल प्रशासनाला सतावत आहे. हे जर चोरी झाले तर नेपाळ सरकारसाठी ती मोठी नामुष्की असेल. पण हे सोने मंदिरात आलेच नसल्याचा एक गट दावा करत आहे.

हे सुद्धा वाचा

संसद हादरली नेपाळच्या संसदेत हा मुद्या पोहचताच, झोपलेली यंत्रणा लागलीच जागी झाली. सरकारने तातडीने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले. मंदिर परिसराला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. 108 किलोग्रॅमचे जलहरी दागिन्यातील 10 किलो सोने चोरीला गेलेले आहे. नेपाळमध्ये ही वार्ता पोहचताच लोकांनी रोष व्यक्त केला. आता भारतात ही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीआयएए सह तपास पथकाने सर्व दागिने गुणवत्तेसाठी आणि वजन करण्यासाठी सोबत नेले.

30 कोटींचे दागिने अनेकांना दागिने मंदिरात पोहचण्यापूर्वीच गायब झाल्याचा संशय आहे. नेपाळमधील विरोधकांनी ही घटना अगोदरच घडल्याचा दावा केला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पशुपतिनाथ मंदिरातील शिवलिंगावर सोन्याची जलहरी दागिने अर्पण करण्याची घोषणा केली. 25 जानेवरी 2021 रोजी ही घोषणा झाली. त्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि दागिने तयार करण्याचे काम सुरु झाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.