जर तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर किती रुपयांचे होणार नुकसान ? आकडा धक्कादायक

ज्योतिषी आणि भारतीय नास्त्रेदमस कुशल कुमार यांनी गेल्या वर्षी भविष्यवानी केली होती की साल 2024 जगासाठी सर्वात तणावपूर्ण असणार आहे. सध्या जगाची त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. तिसरे महायुद्ध झाले तर किती नुकसान होणार आहे ते पाहूयात...

जर तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर किती रुपयांचे होणार नुकसान ? आकडा धक्कादायक
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 6:11 PM

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीत सैन्य घुसविले. इस्रायलचे ऑक्टोबरच्या हल्ल्यात दोन हजार नागरिक ठार झाले होते. त्यानंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझापट्टी आणि पॅलेस्टाईन इतर ठिकाणचे 45 हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. हेजबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाह याच्या खात्मा केल्याने इराणने दीडशे ते दोनशे मिसाईल इस्रायलवर डागली आहेत. आता इस्रायलने लेबनॉनमध्ये शिरुन हेजबोलाच्या सदस्यांना ठार केले आहे. दोन्ही बाजूनी युद्ध सुरु झाले आहे.त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. जर इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला तर तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते असे म्हटले जात आहे.

एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देश माघारही घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यात इस्रायल आणि इराणचा संघर्ष सुरु झाला आहे. लेबनॉन आणि सिरीयावरही हल्ले होत आहेत. इस्रायलच्या विरोधात जगातले 40 हून अधिक इस्लामिक देश एकत्र येत आहेत. त्यात रशियाने देखील बाहेरुन इराणला पाठींबा दिला आहे. त्यातच उत्तर कोरिया वारंवार युद्धाची धमकी देऊन अणू चाचण्या करीत आहे.

भारत आणि चीनचा सीमावाद सुरु आहे. त्यातच चीन तैवानवर केव्हाही हल्ला करु शकतो अशी स्थिती आहे. अमेरिका तैवानला वाचवू शकते का ? आणि अशा स्थितीत भारत काय करणार ? त्यामुळे एकंदरच जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चालले आहे अशीच सर्व स्थिती आहे.

किती रुपयांचे होणार नुकसान ?

सध्या तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त होत आहे. अशाच खरोखरच तिसरे जागतिक महायुद्ध होणार की नाही हे कोणी सांगू शकत नाही. परंतू दुसऱ्या महायुद्धात झालेल्या नुकसानच्या आधारावर भविष्यातील युद्धाच्या नुकसानाचा अंदाज लावता येऊ शकतो. 1939 ते 1945 दरम्यान दुसरे महायुद्ध झाले होते. या युद्धाचे इतिहासकार डॉ. हेलेन फ्राय यांच्या मते त्यावेळच्या आर्थिक नुकसानाचा हिशेब करता सुमारे 21 ट्रीलियन डॉलर ( सुमारे 1764 लाख कोटी रुपये ) नुकसान झाले होते. तिसरे महायुद्ध झाले तर या पेक्षाही 1000 पट नुकसान होण्याचा अंदाज आहे. या आकड्याला पाहीले तर एकूण 17,63,000 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.