Younger Country : अख्खा देश झाला तरुण! वयावर केली मात

Younger Country : एखादा देश एकदम तरुण होऊ शकतो का? तर हो या देशाने ते करुन दाखवलं आहे. अवघ्या 24 तासांत या देशातील नागरिक वयाने तरुण झाले. कसं झालं हे सर्व..

Younger Country : अख्खा देश झाला तरुण! वयावर केली मात
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली : जगात कुठं काय होईल हे सांगता येत नाही. पृथ्वीतलावरील हा देश अवघ्या 24 तासांत तरुण (Young Country) झाला. या देशातील लहानथोर सर्वच मंडळीचं वय घटलं. तुम्हाला वाटेल विज्ञानाच्या मदतीने या देशातील लोकांनी एखादं औषध तर तयार केलं नाही ना? तर तसंही घडलं नाही. कोणत्या ही औषधाविना, जादू विना हा देश एकाच दिवसात तरुण झाला. येथील नागरिक त्यांच्या देशाला ‘शांत सकाळची भूमी’ असं म्हणतात. येथील नागरिकांचं वय 1-2 वर्षांनी कमी झालं. हो, अधिकृतपणे (Government Official) कमी झालं. तिथल्या सरकारने सर्टिफिकेटच दिलं वय घटल्याचं. आता बोला. तुम्ही म्हणाल हा काय चमत्कार, असं कसं झालं?

पूर्वेतील देशाची कमाल तर हा पराक्रम दक्षिण कोरिया (South Korea) या देशाने केला आहे. उत्तर कोरियाच्या जवळील हे सर्वात प्रगत राष्ट्र आहे. आपल्याकडे असलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं आणि काही कार या देशातील कंपन्यांची आहेत. पण इथं एक गडबड होती. ती दुरुस्त केल्याने हा देश एकाच दिवसात तरुण झाला. या देशाने वय मापनाचं आंतरराष्ट्रीय पद्धत स्वीकारली आणि येथील सर्व नागरिकांचे वय एक ते दोन वर्षांनी कमी झाले. येथील राष्ट्रपती यून-सुक ओल या बदलाचे सर्वात मोठे समर्थक होते.

या अगोदर संसदेसमोर बिल या देशात वय मोजण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत स्वीकारण्यात आली. पण त्याअगोदर त्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जनता रस्त्यावर उतरली. 2019 आणि 2021 मध्ये वयाची पद्धत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यासाठी प्रयत्न झाले. संसदेसमोर बिल ठेवण्यात आले. पण त्याला संसदेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

हे सुद्धा वाचा

अजब पद्धत तर हा सर्व खटाटोप येथील वय मोजण्याच्या पद्धतीने झाला. आग्नेय देशात पूर्वी वय मोजण्याची पांरपारिक पद्धत पाळण्यात येत होती. काही देशांनी ही पद्धत बदलली तर व्हिएतनाम, उत्तर कोरिया, दक्षिण कोरियासह इतर बेटांवर हीच पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीनुसार, गर्भधारणा सुरु झाल्यापासून वय मोजण्यात येते. म्हणजे मुल जन्माला आलं तेव्हाचं ते जवळपास एक वर्षाचं गृहित धरण्यात येते. त्याहून कहर म्हणजे जर मुलं वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी जन्माला आले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या 1 तारखेला ते थेट दोन वर्षांचे होते.

पद्धत बदलण्याची मागणी जुनी या अजब पद्धतीमुळे जगात पोहचलेल्या कोरियन लोकांचं हसं व्हायला लागलं. ही पद्धत बदलण्यासाठी 1960 पासून प्रयत्न सुरु झाले. दक्षिण कोरिया झपाटाने पुढे आला. औद्योगिक, तांत्रिक बाबतीत हा देश एकदम पुढारलेला आहे. येथील अर्थव्यवस्था पण मजबूत आहे. त्यामुळे लोकांनी ही पद्धत बदलण्याची मागणी केली. सप्टेंबर 2022 मध्ये त्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 86 टक्के लोकांनी ही पद्धत बदलण्याची मागणी केली होती.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...