या सोन्याच्या ढीगाने ३२ जणांचा बळी घेतला, १२०० वर्षांपूर्वीच्या थडग्यात काय सापडले?
जगात अनेक ठिकाणी पुरात्वत विभागाची कामे सुरु आहेत. एका देशात अशाच पुरातत्व विभागाने एका १२०० वर्षे जुन्या कबरीला शोधून काढले आहे. त्या सोन्याचा प्रचंड मोठा सापडला आहे.

जगभरातील देशांमध्ये प्राचीन स्थळांवर पुरातत्व विभागाकडून खोदकाम सुरुच असते. या खोदकामात संशोधकांना अनेकदा आश्चर्यकारक वस्तू सापडत असतात. या वस्तूंवर त्याकाळी पुरातनकाळातील संस्कृती आणि लोकांच्या राहणीमानाचा अंदाज येत असतो. अशाच प्रकारचे खोदकाम एका देशात झाले आहे. येथे एका १२०० वर्षे जुन्या थडग्यातून हैराण करणाऱ्या वस्तू आढळल्या आहेत. यात खूप साऱ्या सोन्यासोबत किमान ३२ मृतदेहांचे अवशेष देखील सापडले आहेत. असे म्हटले जात आहे की हे मृतदेह बळी दिलेल्या लोकांचे आहेत. काय आहे प्रकरण पाहूयात…
मेट्रो युकेच्या बातमीनुसार हे संशोधन पनामा देशात झाली आहे. पनामा सिटीपासून सुमारे ११० मैल दूर असलेल्या एल कॅनो आर्किओलॉजिकल पार्कमध्ये झालेल्या उत्खननात सोन्याचे घबाड सापडले आहे. यात आश्चर्यकारक वस्तू सापडल्या आहेत. यात सोन्याची शॉल,बेल्ट, दागिने आणि व्हेल म्हणजे देवमाशांच्या दातांपासून बनलेले कानातील रिंगा आदी मौल्यवान आणि महागड्या प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. हे थडगे आणि वस्तू कोकल संस्कृतीच्या एका उच्च पदस्य व्यक्तीचे असून त्याच्या मृतदेहाचे येथे दफन झाले होते. समुदाय प्रमुखाच्या मृत्यूनंतरचे जीवन आरामात जावे यासाठी ३२ लोकांचा बळी देण्यात आला आहे. मृतदेहांची संख्या नेमकी किती होती याचे संशोधन सुरुच आहे. पनामाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या लिनेट मोंटेनेग्रो यांनी सांगितले की या खजान्याची किंमत खूप जादा आहे.
काय काय सापडले ?
असे मानले जाते की हे थडगे किंवा कबर इसवी सन ७५० मध्ये एका उच्च पदस्य नेत्यासाठी बनविली होती. त्याला एका महिलेच्या मृतदेहावर दफन केले होते. त्याकाळी अभिजात वर्गातील लोकांना दफन करण्याची प्रथा होती. कब्रमध्ये आढळलेल्या अन्य वस्तूत बांगड्या, मानवी आकृतीच्या झुमके, मगरीचे मृतदेह, घंट्या, कुत्र्यांच्या दातापासून तयार केलेले स्कर्ट, हाडांपासून तयार केलेली बांसूरी आणि चीनी माती अशा वस्तू सापडल्या आहेत. एल कॅनोमध्ये साल २००८ पासून खोदकाम सुरु आह्.



