Madhya Pradesh : माजी सरपंचाचा एकाच मंडपात तीन प्रेयसींसोबत विवाह, 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप; लग्नात मोठी गर्दी
नानपूर (मोरीफलिया) गावचे माजी सरपंच समर्थ मौर्य यांच्या लग्नाची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या प्रेयसींची नावं मेला आणि साक्री या नानां अशी आहेत. समर्थ वेगवेगळ्या वेळी या तिघींच्या प्रेमात पडले.
नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलीराजपूरमध्ये (Alirajpur) एक अनोखा विवाह पार पडला. एका माजी सरपंचाने आपल्या तिन्ही प्रेयसींसोबत एकाच मंडपात एकत्र लग्न केले आहे. हे चौघेही जवळपास 15 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये (Live-In Relationships) राहत होते. लग्न पत्रिकेत त्यांनी तिन्ही प्रेयसींची नावे सु्ध्दा छापली आहेत. विशेष झालेल्या लग्न सोहळ्याला त्यांची मुलं सुध्दा वऱ्हाडी म्हणून हजर होती. तसेच त्यांच्या समाजातील अधिक लोक लग्नाला उपस्थित होती. तिन्ही प्रेयसींचं वऱ्हाड असल्यामुळे मंडप एकदम भरगच्च होता अशी माहिती मिळाली आहे.
समर्थ वेगवेगळ्या वेळी या तिघींच्या प्रेमात पडले
नानपूर (मोरीफलिया) गावचे माजी सरपंच समर्थ मौर्य यांच्या लग्नाची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या प्रेयसींची नावं मेला आणि साक्री या नानां अशी आहेत. समर्थ वेगवेगळ्या वेळी या तिघींच्या प्रेमात पडले. तसेच 15 वर्षांपासून त्याच्या तीन मैत्रिणींसोबत ते राहत होते. त्या दरम्यान त्यांना मुलं देखील झालेली आहेत. एकूण त्यांना सहा मुलं झाली आहेत.15 वर्षांपूर्वी समर्थ यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण सध्या त्यांची अर्थिकस्थिती चांगली आहे, तसेच त्यांच्याकडे शेती सुध्दा आहे. सध्या त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने दोन दिवसापुर्वी त्यांनी तिन्ही प्रेमिकांसोबत लग्न केले.
समर्थ मौर्य यांचं कुटुंब
समर्थ मौर्य (वय 35 वर्षे) यांना त्यांची पहिली पत्नी नान बाई (वय 33 वर्षे) त्यांना 4 मुले आहेत. यामध्ये 3 मुली आणि 1 मुलगा आहे. दुसरी पत्नी मेलाबाई (29 वर्षे) पासून एक मुलगा आहे. तिसरी पत्नी साक्रीबाई (28 वर्षे) पासून 1 मुलगा आहे.
लग्नाशिवाय समाजात मान्यता नव्हती
आदिवासी भिलाला समाजामध्ये लिव्ह-इनमध्ये राहण्याची आणि मुले जन्माला घालण्याची परवानगी आहे. परंतु कुटुंबातील कोणत्याही सदस्याला लग्नाशिवाय मंगल कार्यात सहभागी होता येत नाही. यामुळे समर्थ यांनी 15 वर्षांनी 3 मैत्रिणींसोबत सात फेरे घेतले आहेत. आता त्यांचा विवाह घटनात्मकदृष्ट्या वैध झाला आहे. त्यांच्या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.