Donald Trump Shooting : तीन लग्न, दोन घटस्फोट आणि अनेक अफेअर , डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वैर खाजगी जीवन

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2017 ते 20 जानेवारी 2021 पर्यंत कार्यभार सांभाळला. संपत्तीच्या वरुन देखील ट्रम्प अनेकदा वादात सापडले आहेत.

Donald Trump Shooting : तीन लग्न, दोन घटस्फोट आणि अनेक अफेअर , डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वैर खाजगी जीवन
donald trump private lifeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 8:39 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेंसिल्वेनिया एका निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका माथेफिरुने स्नायपर गनने घात लावून गोळीबार केला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्लेखोर थॉमस मैथ्यू क्रुक्स याला सुरक्षा रक्षकांनी जागेवरच ठार केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाजगी जीवनावर देखील चर्चा सुरु आहे. प्रचंड श्रीमंत असलेल्या ट्रम्प यांच्या खाजगी जीवनातील रहस्य आश्चर्यचकीत करणारी आहेत. त्यांच्या खाजगी जीवनावरुन नेहमी चर्चा सुरु असते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका माथेफिरुने हल्ला केला होता. त्याला जागेवरच ठार केल्याने त्याच्याविषयी जास्त काही माहिती मिळालेली नाही. परंतू त्याच्या घरी स्फोटकं सापडली आहेत. डोनाल्ड आपल्या रंगेल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. त्याकारणाने त्यांना बऱ्याच कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या आहेत. ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उमेदवार आहेत. जेथे त्यांच्यावर गोळीबार झाला तेथील अनेक व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.अमेरिकन सर्व्हीस सीक्रेच एजन्सीने ते सुरक्षित असल्याचा म्हटले आहे.यापूर्वी अनेक वादात ते सापडले आहेत.

31 वर्षांचे असताना पहिला विवाह

त्यांचे खाजगी जीवन आणि संपत्तीबाबत अनेक रहस्यं आहेत. साल 1977 मध्ये 31 वर्षांचे असताना ट्रम्प यांनी इवाना यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी ते नुकतेच आपल्या वडीलांच्या रियल इस्टेट उद्यागाची धुरा सांभाळत होते. इवाना यांच्यापासून डोनाल्ड यांना इवांका,एरिक आणि डोनाल्ड ज्युनिअर अशी तीन मुले झाली. इवाना ट्रम्प ऑर्गेनायझेशनमध्ये इंटेरिअर डिझाईनचे व्हाईस प्रेसिडेन्ट पद सांभाळले होते.

ट्रम्प यांचा दुसरा घटस्फोट

खाजगी जीवनात आणि संपत्तीबाबत अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. साल 1977 मध्ये 31 वर्षांच्या ट्रम्प यांनी इवाना यांच्याशी लग्न केले.  14 वर्षांनंतर साल 1991 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे मार्ला मेपल्स हीच्याशी अफेअर सुरु झाले. या दोघांना मुलगी (  टिफनी ) झाल्यानंतर त्यांनी साल 1993 मध्ये मार्लाशी दुसरा विवाह केला.  1997 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्ला यांनाही घटस्फोट दिला. त्यानंतर मेलानिया त्यांच्या जीवनात आली.

संपत्तीवरुन देखील वादात सापडले

मूळच्या स्लोवेनियाच्या असलेल्या मेलानिया फॅशन मॉडेल बनण्यासाठी 1996 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आल्या होत्या. येथे त्यांनी ट्रम्प मॉडेल मॅनेजमेंट आणि इरीन मॅरी मॉडल्स सोबत काम केले. साल 2005 मध्ये मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी विवाह केला. त्यांना 2006 मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी बॅरन असे ठेवले. जेव्हा बॅरेन चार महिन्यांचा होता. तेव्हा ट्रम्प यांचे खरे रुप मेलानिया यांना कळले. जुलै 2006 मध्ये ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंध ठेवल्याचा आरोप झाला होता. प्लेबॉय मॉडेल रेन मॅकडॉगल हीच्याशी देखील त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश झालेला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.