blast in pakistan : पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात मोठा स्फोट, चार चीनी नागरिकांचा मृत्यू, 15 जखमी
गुलशनचे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणाले की, हा स्फोट दहशतवादी घटना आहे की अपघात याचा तपास सुरू आहे.
कराची : पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजकीय स्थिती बिघडली असतनाच येथे सामाजिक स्थिती ही बिघडल्याचे समोर येत आहे. एकीकडे पाकिस्तानवर तालिबानने आरोप केला आहे. तर तालिबानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानविरोधात तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आमच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. हा पाकिस्तानसाठी हादरा मानला जात असतानाच आता पाकिस्तान आंतर्गत हल्ल्यांनी ही हादरला आहे. पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा स्फोट (Blast) झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र झालेल्या स्फोटात चार चीनी नागरिकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याचे कळत आहे. तसेच हा स्फोट कराची विद्यापीठाच्या (University of Karachi) कॅम्पसमध्ये असणाऱ्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये झाला.
व्हॅनमध्ये हा स्फोट
प्रसारमाध्यमांनी सांगितले की, स्फोटानंतर बचाव आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिसराला वेढा घातला. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला त्यात सात ते आठ जण होते. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मृत्यू होणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश
प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये एक विदेशी नागरिक, एक रेंज अधिकारी आणि एक सुरक्षा रक्षक आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत्यू होणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. हा स्फोट दुपारी 1.52 मिनिटांनी कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारमध्ये झाला. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटमध्ये चीन भाषा शिकवली जाते. तर स्फोट होताच बचाव आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. सध्या येथे पोलिसांनी घेराव केला असून लोकांना बाहेर काढले जात आहे.
आत्मघाती हल्लाची शक्यता
पोलिसांनी अद्याप स्फोटाचे कारण दिलेले नाही. स्फोटाच्या वेळी चिनी भाषा शिकवणाऱ्या कन्फ्युशियस संस्थेतून पीडित महिला बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. कराची पोलिसांचे पूर्व उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुकद्दस हैदर यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या काहीही सांगता येणार नाही. दरम्यान, गुलशनचे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणाले की, हा स्फोट दहशतवादी घटना आहे की अपघात याचा तपास सुरू आहे.
Three people killed and 15 injured in explosion at a four-storey building opposite the Karachi University Maskan gate in Gulshan-e-Iqbal: Pakistan media
— ANI (@ANI) October 21, 2020
Baloch Liberation Army (BLA) takes responsibility for the Karachi University Attack. See the video of suicide attacker. #Karachi#KarachiBlast#Pakistan#KarachiUniversityBlast pic.twitter.com/tH5yxN0fxt
— Anwar Ansari (@Anwar2398Ansari) April 26, 2022