ट्रम्प यांचा यु-टर्न, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्सवर टॅरीफ लागणार नाही
अमेरिकेने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळले आहे. आता अमेरिका या उत्पादनांवर प्रत्युत्तरात्मक ( टॅरिफ ) शुल्क लादणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा अॅपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांना होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ प्रकरणात पुन्हा एकदा घुमजाव केले आहे. आधी ट्रम्प यांनी चीन वगळून अन्य देशांवर ९० दिवसांसाठी टॅरिफच्या निर्णयावर पॉझ घेतला होता. परंतू आता असे वृत्त आहे की अमेरिकेने इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि चिप्सला टॅरिफच्या कॅटेगरीतून बाहेर काढले आहे. म्हणजे आता या साहित्यावर अमेरिकेच्या वतीने रेसिप्रोकल टॅरिफ लावले जाणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने एप्पल, सॅमसंग सारख्या कंपन्यांचा फायदा होणार आहे.
अमेरिकेत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर टॅरिफ लावल्याने याच्या किंमती वाढण्याची शंका होती. यात जेवढे नुकसान इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना झाले असते त्याहून अधिक झळ अमेरिकेला सहन करावी लागली असती. यामुळे अमेरिकेने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सेमीकंडक्टर वर उलट कारवाई म्हणून टॅरिफ लावण्याचा निर्णय रद्दबातल केला आहे.
ट्रम्प यांनी का घेतला यू-टर्न
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या ट्रम्प यांच्या या नवीन निर्णयामागे फायनान्शियल एक्सपर्टनी दिलेल्या सल्ल्यामुळे फेरफार झाल्याचे म्हटले जात आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावल्याने केवळ किंमतीच वाढतील असे नव्हे तर अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांना मोठा फटका बसला असता.




एप्पल आणि डेल सारख्या कंपन्या आपल्या बहुतांशी उत्पादने चीन आणि अन्य आशियाई देशात बनवते. टॅरिफने किंमती वाढण्याचा मोठा धोका होता. ज्याचा प्रभाव अमेरिकेतील लोकांवर झाला असता. या शिवाय सेमीकंडक्टर इंडस्ट्रीने देखील ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकला होता. चिप्सची कमतरता ही आधीच जागतिक पातळीवर मोठी गंभीर समस्या आहे आणि नव्या टॅरिफने हे संकट अधिकचे व्यापक केले असते.
या वस्तूंवर जवाबी शुल्क लागणार नाही –
अमेरिकेने इलेक्ट्रॉनिक सामानांच्या यादीतील कोणत्या वस्तूंवरील टॅरिफ हटवले आहे ते पाहूयात…
ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग मशीन
मशीनीमध्ये लागणारे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स
स्मार्टफोन्स
राऊटर आणि स्विच
NAND फ्लॅश मेमोरी
माऊंटेड पीजो इलेक्ट्रिक क्रिस्टल
ट्रांझिस्टर