turkey news : तुर्कीने आपले नाव बदलले, संयुक्त राष्ट्रांकडून मिळाली मान्यता; जाणून घ्या नाव बदल्याचे कारण
Turkiye : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात पोहोचण्यापूर्वी, अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्की संस्कृती आणि मूल्यांचे अधिक चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुर्कीऐवजी "तुर्कीये" वापरण्याचे आदेश दिले.
नवी दिल्ली – तुर्कस्तान (Turkistan) यापुढे संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘तुर्किये’ (Turkiye) या नावाने ओळखले जाईल. तुर्कस्तानने नावात बदल करण्याची विनंती संयुक्त राष्ट्राकडे (United Nations) केली होती, त्या नावाला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या रीब्रँडिंग मोहिमेअंतर्गत, अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना देशाचे नाव बदलण्याची विनंती केली होती. तसेच त्यांनी त्यावेळी “तुर्की लोकांची संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व आणि अभिव्यक्ती करेल,” असेही एर्दोन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते. केलेली विनंती मान्य होताचं नाव बदलण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्राकडून जाहीर करण्यात आले आहे. तुर्कस्तानातील बरेच लोक त्यांचा देश तुर्की म्हणून ओळखतात. विशेष म्हणजे तुर्कीच्या सरकारी वृत्तवाहिनी टीआरटीने गेल्यावर्षी घोषणा केल्यानंतरच तात्काळ नावात बदल केला होता. केंब्रिज इंग्रजी शब्दकोशानुसार टर्की म्हणजे मूर्ख किंवा पराभूत अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो.
तुर्कीला एक ब्रँड नाव बनवण्याचा हेतू
एका नवीन ब्रँड नावासह देशाला जगात प्रस्थापित करण्याचा आणि टर्की या शब्दाशी संबंधित काही नकारात्मक प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे सरकार बर्याच काळापासून तुर्कीचे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त नाव बदलून “तुर्किये” करण्याचा प्रयत्न करत होते. कारण हा शब्द तुर्कीच्या स्पेलिंग आणि उच्चाराशी मिळतो. तसेच 1923 मध्ये तुर्कीच्या स्वातंत्र्याची घोषणा झाल्यापासून येथील रहिवासी ‘तुर्की’ असा उच्चार करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून सरकारी कागदपत्रांमध्ये नावे बदलण्यात आली
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात पोहोचण्यापूर्वी, अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्की संस्कृती आणि मूल्यांचे अधिक चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुर्कीऐवजी “तुर्कीये” वापरण्याचे आदेश दिले. देशातून परदेशात निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर ‘मेड इन तुर्की’ ऐवजी ‘मेड इन तुर्कीये’ वापरावे, असेही या आदेशात म्हटले होते. तेव्हापासून तुर्की मंत्रालयांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये “तुर्कीये” वापरण्यास सुरुवात केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने त्याचे नाव इंग्रजीमध्ये बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक व्हिडिओ देखील तयार केला आहे. व्हिडिओमध्ये जगभरातील पर्यटक प्रसिद्ध स्थळांवर “हॅलो तुर्कीये” म्हणत असल्याचे दाखवण्यात आले आहे.