मै जहाँ रहूं, जहाँ मे याद रहे तू.. जाबांज महिला सैनिकाच्या माथ्याचं चुंबन, महिलेचा फोटो व्हायरल..

विदेशात भारतीयांबद्दलचा आदर उंचावल्याची एक भावना महिला जवानाच्या डोळ्यांतून स्पष्ट जाणवतेय.

मै जहाँ रहूं, जहाँ मे याद रहे तू.. जाबांज महिला सैनिकाच्या माथ्याचं चुंबन, महिलेचा फोटो व्हायरल..
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 12:38 PM

तुर्कस्थान आणि सिरीयातला भूकंप (Earthquake). जमीन दुभंगली.आभाळ फाटल्याची गत झाली. या संकटानं (Desaster) तिच्या भोवतीचं जग अक्षरशः उध्वस्त झालं. वेदनांनी विव्हळणारे लाखो अन् मदतकार्यात (rescue operation) लागलेले हजारो. अशा स्थितीत एका भारतीय महिला सैनिकानं तुर्कीतल्या एका महिलेचं छोटसं जग सावरायला मदत केली. तिची आपली माणसं वाचवली. या उपकारांची परतफेड कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही.. हीच भावना मनात ठेवून तुर्कीच्या महिलेनं भारतीय जवानाच्या माथ्याचं चुंबन घेतलं. अत्यंत भावनिक क्षणाचा हा फोटो सध्या वेगानं व्हायरल होतोय. या प्रसंगी भारतीय महिला सैनिकाच्या डोळ्यातली चमक जास्त बोलकी ठरतेय. एका महिलेच्या भावना समजून घेतानाच सैनिक म्हणून तिनं परदेशात जाऊन भारत देशाचं नाव उंचावलं. हा अभिमान तिच्या डोळ्यांतून स्पष्ट झळकतोय.

भारतीय आर्मीच्या अतिरिक्त महासंचालनालयाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय. we care असं शीर्षक साठी देण्यात आलंय. माणूसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म, अशी प्रतिक्रिया एका यूझरने त्यावर दिली आहे. तर दुसऱ्याने भारतीय जवानांप्रती अभिमानाची भावना दर्शवली. माणुसकीच्या सेवेसाठी भारत सदैव तत्पर असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

तुर्की आणि सिरीयातील भूकंपाने आतापर्यंत १९ हजार नागरिकांचा बळी घेतला आहे. २३ कोटी नागरिक या आपत्तीमुळे बाधित झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय. अनेक देशांना मदतीचं आवाहन केलंय.

भारताचं ‘ऑपरेशन दोस्त’

हा भूकंप होताच भारताना तुर्कस्थानात भारतीय जवानांचं एक पथक मदतकार्यासाठी पाठवलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याला’ऑपरेशन दोस्त’ असं म्हटलंय.

जीवनावश्यक वस्तू, मोबाइल हॉस्पिटल तसेच बचावासाठीची विशेष टीम भारतानं तुर्कीत विशेष विमानाने पाठवली. इतर देशांप्रमाणेच भारतीय जवानदेखील या आपत्तीतून सावरण्यासाठी तुर्कस्थानात मोठं सहकार्य करत आहेत. भारतीय नेव्हीकडून यासंदर्भातील छायाचित्र वेळोवेळी शेअर केली जात आहेत. त्यापैकीच सध्याचा हा फोटो जास्त व्हायरल होतोय.

मै जहाँ रहूं, जहाँ में याद रहे तू..

हा फोटो पाहून ऐ वतन वतन, मेरे आबाद रहे तू.. मै जहाँ रहूँ, जहाँ में याद रहे तू.. हे गाणं आठवल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तानात राहून भारताला माहिती पाठवणाऱ्या भारतीय महिला गुप्तहेराच्या कहाणीवर आधारीत राझी चित्रपटातील हे गाणं. सध्याच्या स्थितीला तंतोतंत लागू होत नसलं तरीही विदेशात भारतीयांबद्दलचा आदर उंचावल्याची एक भावना महिला जवानाच्या डोळ्यांतून स्पष्ट जाणवतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.